गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:37 IST2025-07-29T15:36:56+5:302025-07-29T15:37:35+5:30
Aman Kumar : अमनच्या गर्लफ्रेंडने नेहमीच त्याच्यावर विश्वास ठेवला. इतकंच नाही तर तिने त्याला अभ्यासातही मदत केली.

गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
सिव्हिल सर्व्हिस सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दिवसरात्र कठोर परिश्रम, श्रद्धा आणि शिस्त आवश्यक आहे. याच दरम्यान अमन कुमारने घवघवीत यश मिळवलं आहे. कोचिंगशिवाय JPSC पास करत तो मोठा अधिकारी झाला आहे. त्याच्या या यशात त्याच्या गर्लफ्रेंडचं खूप योगदान आहे. अमनने सांगितलं की त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला प्रत्येक वळणावर साथ दिली आहे. तिने नेहमीच त्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. अमनच्या गर्लफ्रेंडने नेहमीच त्याच्यावर विश्वास ठेवला. इतकंच नाही तर तिने त्याला अभ्यासातही मदत केली.
अमन दहावीपासूनच सिव्हिल सेवेत जाऊ इच्छित होता. त्याचा मोठा भाऊ देखील अधिकारी आहे, ज्यामुळे त्याला पुढे जाण्यासाठी आणि वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी नेहमीच मदत मिळत राहिली. त्याने त्याच्या आई आणि वडिलांसोबत राहून अभ्यास केला आणि दिवसरात्र मेहनत करून ही परीक्षा उत्तीर्ण झाली. या परीक्षेत यश मिळवल्यानंतर त्याने आपल्या यशाचं श्रेय आईवडील आणि त्याच्या गर्लफ्रेंडला दिलं.
अमनच्या अभ्यासाबद्दल बोलताना सांगितलं की, त्याने बारावीनंतर आनंद कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. त्यानंतर नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. कोचिंगशिवाय या परीक्षेची तयारी केली आहे. अभ्यासासाठी त्याने पुस्तके, इंटरनेट, चॅटजीपीटीची मदत घेतली आहे. अमनचे वडील अनिल प्रसाद घरखर्च चालवण्यासाठी वर्षानुवर्षे सेकंड-हँड पुस्तकांचे दुकान चालवत आहेत.
आज ते आपल्या मुलाच्या कामगिरीमुळे खूप आनंदी झाले आहेत. वडिलांनी सांगितलं की, मुलगा लहानपणापासूनच मेहनती होता. त्याने आयुष्यभर जे काही कमावलं ते मुलांवर खर्च केलं. आयुष्यभर पुस्तकं विकली आहेत आणि त्यामुळेच मुलगा अधिकारी झाला आहे. अमन कुमारपासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. त्याने मेहनतीने यश मिळवलं.