शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 2:44 PM

जे. पी. नड्डा यांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे. पी. नड्डा यांची निवड करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री व निवडणूक अधिकारी राधा मोहन सिंह यांनी जे. पी. नड्डा यांच्या नावाची भाजपाच्या अध्यक्षपदी बिनविरोध म्हणून घोषणा केली आहे. यावेळी भाजपाचे मावळते राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपाचे इतर नेते उपस्थित होते.  

भाजपाच्या अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांचे नाव आधीपासूनच जवळपास निश्चित झाले होते. मात्र, त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी होती. अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे. पी. नड्डा यांचे नाव चर्चेत होते. पण, त्यावेळी त्यांची  कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.  

जे. पी. नड्डा यांचा राजकीय प्रवास...राज्यसभेचे सदस्य असलेले जे. पी. नड्डा पक्षाच्या सर्वोच्च संसदीय बोर्डचे सचिवही आहेत. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचा कार्यकाळ जानेवारी २०१९ मध्ये पूर्ण झाला. लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन अध्यक्षपदासाठीची निवडणूक टाळली गेली. अमित शहा केंद्रीय गृहमंत्री बनल्यामुळे जे. पी. नड्डा यांना जून महिन्यात कार्यकारी अध्यक्ष बनवले गेले. जे. पी. नड्डा मोदी सरकार-१ मध्ये आरोग्य मंत्री होते. विद्यार्थी जीवनापासून ते राजकारणात सक्रिय होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि संघटनेत त्यांनी वेगवेगळ््या जबाबदा-या पार पाडल्या. ते पहिल्यांदा १९९३ मध्ये हिमाचल प्रदेश विधानसभेचे सदस्य बनले. नंतर ते राज्यात व केंद्रातही मंत्री बनले होते.

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शहाj. p. naddaजे. पी. नड्डा