‘हवामान बदलाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हा’, पंतप्रधान मोदींचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 09:16 IST2023-04-16T09:16:40+5:302023-04-16T09:16:51+5:30
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात लोकसहभागासह सामूहिक प्रयत्नांचे आवाहन केले. जेव्हा एखादा विचार चर्चेच्या टेबलापासून जेवणाच्या टेबलापर्यंत पोहोचतो, तेव्हा तो एक व्यापक लोकचळवळ बनतो, असे ते म्हणाले.

‘हवामान बदलाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हा’, पंतप्रधान मोदींचे आवाहन
वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात लोकसहभागासह सामूहिक प्रयत्नांचे आवाहन केले. जेव्हा एखादा विचार चर्चेच्या टेबलापासून जेवणाच्या टेबलापर्यंत पोहोचतो, तेव्हा तो एक व्यापक लोकचळवळ बनतो, असे ते म्हणाले.
जेव्हा लोकांना ही जाणीव होते की, दैनंदिन जीवनात त्यांनी केलेले छोटेसे प्रयत्नदेखील खूप प्रभावी ठरू शकतात, तेव्हा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो, असे पंतप्रधानांनी शुक्रवारी जागतिक नेत्यांना सांगितले. जागतिक बँकेने ‘मेकिंग इट पर्सनल : हाऊ बिहेविअरल चेंज कॅन टॅकल क्लायमेट चेंज’ या विषयावर आयोजित केलेल्या परिषदेत ते आभासी पद्धतीने बोलत होते. ‘‘जगभरातील लोक हवामान बदलाबद्दल बरेच काही ऐकतात. त्यांच्यापैकी अनेकांना खूप अस्वस्थ वाटते, कारण त्यांना माहीत नाही की, ते याचे परिणाम कमी करण्यासाठी काय करू शकतात. यात केवळ सरकारे किंवा जागतिक संस्थांची भूमिका आहे, असे त्यांना सतत वाटू लागले आहे. तेही योगदान देऊ शकतात हे त्यांना कळले तर त्यांची अस्वस्थता कृतीत बदलेल,” असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)