शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

JOB Alert : गुड न्यूज! AIIMS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी होणार भरती; मिळणार 1 लाख पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 12:27 PM

BECIL AIIMS Recruitment 2021: इंजिनीअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (बेसिल)ने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) ने भरतीसाठी जाहिरात दिली आहे.

नवी दिल्ली - एम्स दिल्लीमध्ये सरकारी नोकरी मिळण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी आता एक सुवर्णसंधी आहे. इंजिनीअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (बेसिल)ने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स), नवी दिल्लीच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट यूनिट (पीएमयू)मध्ये कन्सल्टंट आणि सिनियर कन्सल्टंट पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली आहे. कंपनीने 2 जुलै 2021 ला जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार दोन्ही पदांच्या एकूण 5 जागा रिक्त आहेत. या जागांवर भरती केली जाणार आहे.

या पदाची मुदत सुरुवातीला एक वर्षाची असणार आहे. हा कालावधी उमेदवाराचे काम आणि संस्थेची आवश्यकता पाहून वाढवण्यात येणार आहे. बेसिल्स एम्स भरती 2021 च्या जाहिरातीनुसार नोकरीसाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट becil.com वर जाऊन अर्ज करु शकतात. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 2 जुलैला सुरू झाली आहे. 15 जुलै 2021 ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अर्ज शुल्क

ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. एकाहून अधिक पदांसाठी अर्ज करण्यासाठी दुसऱ्या पदासाठी 500 रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.

या पदांसाठी होणार भरती

सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (हॉस्पिटल मॅनेजमेंट)सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (प्रोजेक्ट मॅनेजमेंट)सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (प्रोक्योरमेंट)सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (प्रोजेक्ट फायनांशिअल मॅनेजमेंट)सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (आयटी प्रोजेक्ट मॅनेजमेंट)

किती मिळेल पगार?

कन्सल्टंट पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारास 50 हजार रुपये प्रतिमहा पगार मिळेल.सिनियर कन्सल्टंट पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारास 1 लाख रुपये प्रतिमहा पगार मिळेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :AIIMS hospitalएम्स रुग्णालयjobनोकरीIndiaभारत