नोकऱ्यात वाढ, महागाईच्या तुलनेत पगार मात्र नाही; नीति आयोगाचे सदस्य अरविंद विरमानी यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 11:37 IST2025-03-03T11:37:43+5:302025-03-03T11:37:43+5:30
तुमच्यात कौशल्य असेल तर नोकरी मिळणे सोपे होते, असेही ते म्हणाले.

नोकऱ्यात वाढ, महागाईच्या तुलनेत पगार मात्र नाही; नीति आयोगाचे सदस्य अरविंद विरमानी यांचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशात रोजगार तर वाढले आहेत, परंतु नियमित नोकऱ्यांमध्ये सात वर्षांत महागाईच्या तुलनेत वास्तविक वेतन वाढले नाही, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. अरविंद विरमानी यांनी म्हटले आहे. नोकरी आणि कौशल्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुमच्यात कौशल्य असेल तर नोकरी मिळणे सोपे होते, असेही ते म्हणाले.
नोकऱ्या वाढल्या का?
विरमानी यांनी म्हटले आहे की, पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेच्या (पीएलएफएस) आकडेवारीनुसार, मागील सात वर्षांत कामगार-लोकसंख्येचे प्रमाण वाढले आहे.
याचा अर्थ नोकऱ्यांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत वाढत आहे. यात चढउतारही आहे. याचा कल पाहता नोकऱ्या वाढत आहेत, असे दिसते. तथापि, नोकऱ्या वाढल्या, असे मात्र म्हणता येणार नाही.
२०२३-२४ मध्ये सर्व वयोगटांसाठी कामगार-लोकसंख्या प्रमाण ४३.७ टक्क्यांपर्यंत वाढले होते. २०१७-१८ मध्ये हे प्रमाण ३४.७ टक्के होते.