JOB Alert : सरकारी बँकेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; 'या' पदासाठी मोठी भरती; जाणून घ्या, कसा करायचा अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 09:02 AM2021-07-06T09:02:40+5:302021-07-06T09:07:03+5:30

SBI Apprentice Recruitment 2021 : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरी (Bank Job) मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.

JOB Alert sbi apprentice recruitment 2021 vacancies on apprentice post apply online before 26 july 2021 | JOB Alert : सरकारी बँकेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; 'या' पदासाठी मोठी भरती; जाणून घ्या, कसा करायचा अर्ज?

JOB Alert : सरकारी बँकेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; 'या' पदासाठी मोठी भरती; जाणून घ्या, कसा करायचा अर्ज?

googlenewsNext

नवी दिल्ली - सरकारी बँकेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आता एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरी (Bank Job) मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. एसबीआयने 5 जुलै रोजी अप्रेरेंटिस पदाच्या भरतीसाठी एक नोटीफिकेशन जारी केलं आहे. यासाठीच रजिस्ट्रेशन हे 6 जुलैपासून म्हणजेच आजपासून सुरू झालं आहे. योग्य आणि इच्छूक उमेदवार 26 जुलै 2021 पर्यंत वेबसाईटवर जाऊन यासाठी अर्ज करू शकतात. देशभरातील विविध बँकांमध्ये अप्रेरेंटिससाठी जवळपास 6100 पद उपलब्ध आहे. 

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची तारीख - 6 जुलै 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 जुलै 2021

जागा

एकूण - 6100

वयोमर्यादा

उमेदवाराचं वय हे 20 ते 28 वर्षांमधील असणं गरजेचं आहे. 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून, संस्थानातून ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली पाहिजे. 

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड ही ऑनलाईन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा यावर केली जाणार आहे. 

अर्ज कसा करावा?

योग्य आणि इच्छूक उमेदवार हे एसबीआयच्या वेबसाईटवर जाऊन 6 जुलै ते 26 जुलै 2021 पर्यंत अर्ज करी शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: JOB Alert sbi apprentice recruitment 2021 vacancies on apprentice post apply online before 26 july 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.