शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘जेएनयू’ विद्यार्थ्यांचा संसदेवरील मोर्चा रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 01:47 IST

वसतिगृह शुल्क वाढविल्याच्या निषेधार्थ तीन आठवड्यांपासून आंदोलन

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन सोमवारी संसद भवनाकडे आपला मोर्चा वळविला; पण पोलिसांनी त्यांना विद्यापीठ परिसराच्या आतच रोखले. वसतिगृह शुल्क वाढविल्याच्या निषेधार्थ गत तीन आठवड्यांपासून हे आंदोलन सुरू आहे. आपल्या मागण्यांकडे संसदेचे लक्ष वेधण्यासाठी हे विद्यार्थी रस्त्यांवर उतरले आहेत. जोपर्यंत सरकार शुल्कवाढ मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे या विद्यार्थींनी स्पष्ट केले आहे.या विद्यार्थ्यांना शेकडो पोलिसांनी बाबा गंगनाथ मार्गावरच अडविले. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून पुढे आल्यानंतर ६०० मीटर अंतरावर या विद्यार्थ्यांना रोखण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पोलिसांनी जागेवरच रोखले.वसतिगृहाच्या नियमावलीविरुद्ध हे विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. यात शुल्कवाढ, ड्रेस कोड आणि येण्या-जाण्याची वेळ याबाबत नियम आहेत. जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष एन.साई बालाजी म्हणाले की, संसदेकडे शांततेत जाणारा हा मोर्चा पोलिसांनीरोखला.मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्थापन केली समितीजेएनयूमधील कार्यप्रणाली सुरळीत करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सोमवारी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. एचआरडीचे सचिव आर. सुब्रह्मण्यम म्हणाले की, सर्वांशी चर्चा करण्यासाठी आणि त्यातून जेएनयूचे कामकाज सुरळीत करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला सल्ला देण्यासाठी सरकारने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.यात यूजीसीचे माजी अध्यक्ष व्ही. एस. चौहान, एआयसीटीई अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे आणि यूजीसी सचिव रजनीश जैन यांचा समावेश आहे. ही समिती विद्यार्थी आणि प्रशासनसोबत तत्काळ चर्चा सुरू करेन.