शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

JNU Attack : 'भारत, ज्या देशात विद्यार्थ्यांपेक्षा गायींना जास्त सुरक्षा मिळते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 13:32 IST

JNU Attack : जेएनयूतील हल्ल्यात 20 जण जखमी झाले असून जखमींमध्ये विद्यार्थी

नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रविवारी (5 जानेवारी) विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आली आहे. या हल्ल्यात २० विद्यार्थी जखमी झाले. या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांसह आता क्रिकेट आणि बॉलिवूडमधूनही या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणीही केली आहे. त्यानंतर, अभिनेत्री ट्विंकल खन्नानेही या हल्ल्याचा निषेध नोंदवला.

अभिनेत्री ट्विंकल खन्नाने ट्विट करून एका वर्तमानपत्राची बातमी शेअर केली आहे. त्यासोबतच, भारतात विद्यार्थ्यांपेक्षा गायींना अधिक संरक्षण मिळतं, असेही तिने म्हटले आहे. ''भारत, ज्या देशात विद्यार्थ्यांपेंक्षा गायींनी अधिक सुरक्षा मिळते. पण, हा तोच देश आहे ज्याने कुणाच्या भितीने जगण्यास स्पष्ट नकार दिलाय. आपण, हिंसा करून लोकांवर दबाव निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळे, अजून जास्त विरोध होणार, आंदोलन होणार, रस्त्यावर जादा लोकं उतरणार...'' असे ट्विट ट्विंकल खन्नाने केलं आहे.

जेएनयूतील हल्ल्यात 20 जण जखमी झाले असून जखमींमध्ये विद्यार्थी, संघटनांचे नेते आणि शिक्षकांचाही समावेश आहे. विद्यापीठाच्या अनेक दालनांची मोडतोड करण्यात आली आहे. जखमींना उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या हल्ल्याचे पडसात मुंबईतही दिसत असून जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आयआयटी पवईतील विद्यार्थ्यांनी फ्लॅश मॉब केला. तर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या घटनेचा निषेध करत आपली प्रतिक्रिया दिली. 

हल्ल्यात जखमी झालेली विद्यार्थीसार्थक (31), कमलेश (30), सुरी कृष्णन (23), गौरव (24), शांभवी (21), वेलेंटिना (26), शिवम चौरसिया (27), मनीष जंगीड (25), शेषमणी साहू (22), आयुशी घोष (23), अमित परमेश्वरम (37), निखिल मॅथ्यू (24), आयुष सिंह (19), ऐश्वर्य प्रताप (25), शौकत (28), उज्ज्वल (22), दीपशिखा (19), सीमित (21), कामरान (20) असे 19  विद्यार्थी जखमी झाले असून, सुचरिता सेन (45) या जखमी शिक्षिकेलाही रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. या हल्ल्याचा अनेकांनी निषेध नोंदवला आहे.

टॅग्स :jnu attackजेएनयूTwinkle Khannaट्विंकल खन्नाTwitterट्विटरNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिस