जेएनएनयुआरएमचे उर्वरित ४३ कोटींची मागणी
By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:19+5:302014-12-20T22:28:19+5:30
जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजनेचे राहिलेली दहा टक्के म्हणजेच ४३ कोटी रुपयांचा निधी नांदेड मनपाला देण्याची मागणी नांदेड उत्तरचे आ़डी़पी़सावंत यांनी अधिवेशनात केली आहे़

जेएनएनयुआरएमचे उर्वरित ४३ कोटींची मागणी
ज ाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजनेचे राहिलेली दहा टक्के म्हणजेच ४३ कोटी रुपयांचा निधी नांदेड मनपाला देण्याची मागणी नांदेड उत्तरचे आ़डी़पी़सावंत यांनी अधिवेशनात केली आहे़नागपूर येथे सुरु असलेल्या अधिवेशनात आ़सावंत यांनी नांदेडातील अनेक प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले़ त्यात सुरुवातीला त्यांनी जेएनएनयुआरएमचा दहा टक्के निधी लवकर देण्याची मागणी केली आहे़ ही रक्कम वेळेवर मिळाली नाही तर प्रकल्पाचा खर्च वाढत जाईल़ ड वर्गात असलेल्या नांदेड महापालिकेला एवढा पैसा जमा होणार नसल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले़ त्याचसोबत नगरोत्थान योजनेतील रस्त्याकरीता २५ कोटी रुपयांचा निधी त्वरित देण्यात यावा़ १३ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार भांडवली मुल्य आधारीत मालमत्ता कर आकारणी व वसूली सुुरु झालेली असल्याने नांदेड मनपाला ३० कोटी रुपये देण्याचीही त्यांनी मागणी केली़ विशेष सहाय्यक विभागाच्या प्रश्नासह ई-सेवा केंद्राच्या पायलट प्रोजेक्टबद्दलही त्यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले़