अरेरे! मेव्हणीसोबत डीजेवर नाचणं तरुणाला पडलं महागात; पत्नीने चप्पलेने केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 20:04 IST2024-03-17T19:55:49+5:302024-03-17T20:04:29+5:30

तरुणाची मेव्हणी डीजेवर नाचत होती. तिने तरुणाला खुणावत नाचायला बोलावले. तो देखील तिला होकार देत नाचू लागला. दोघेही आनंदाने नाचू लागले.

jija dance with saali on dj angry wife beat him with slippers in agra | अरेरे! मेव्हणीसोबत डीजेवर नाचणं तरुणाला पडलं महागात; पत्नीने चप्पलेने केली मारहाण

अरेरे! मेव्हणीसोबत डीजेवर नाचणं तरुणाला पडलं महागात; पत्नीने चप्पलेने केली मारहाण

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका व्यक्तीला आपल्या मेव्हणीसोबत डान्स करणं महागात पडलं आहे. संतापलेल्या पत्नीने डान्स करणाऱ्या पतीला सर्वांसमोर मारहाण केली आहे. लोक जिथे आनंदाने नाचत होते, तिथे या घटनेनंतर शांतता पसरली होती. हे सर्व नेमकं काय घडत आहे हे लोकांना समजल नाही.

मथुरा जिल्ह्यातील मगोर पोलीस ठाण्यात राहणाऱ्या या तरुणीचा 2011 मध्ये आग्रा जिल्ह्यातील कागरौल पोलीस ठाण्यात राहणाऱ्या तरुणाशी विवाह झाला होता. काही वर्षांनी मुलगा झाला. पती, पत्नी आणि मुलगा सुखाने राहत होते. हे कपल नातेवाईकांच्या घरी लग्न समारंभासाठी गेलं होतं.

तरुणाची मेव्हणी डीजेवर नाचत होती. तिने तरुणाला खुणावत नाचायला बोलावले. तो देखील तिला होकार देत नाचू लागला. दोघेही आनंदाने नाचू लागले. याच दरम्यान, तरुणाच्या पत्नीने त्या दोघांना नाचताना पाहिलं आणि तिने त्यांना नाचण्यापासून थांबवलं. पण तो थांबला नाही, त्यामुळे पत्नी संतापली.

पत्नीने सर्वांसमोर पतीला चप्पलेने मारहाण केली. पत्नीच्या या कृतीनंतर तो नाराज झाला आणि तेथून निघून गेला.त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत जे केले ते तो विसरू शकला नाही. या रागात त्याने पत्नीसोबत राहण्यास नकार दिला. यानंतर पत्नीने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याचे म्हणणे ऐकून घेतले आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कुटुंब समुपदेशन केंद्राशी संपर्क साधला.

Web Title: jija dance with saali on dj angry wife beat him with slippers in agra