बिहार : पटना येथील नालंदा मुक्त विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी गेल्या सप्टेंबर महिन्यात वयाच्या 98 व्या वर्षी एमए (अर्थशास्त्र)च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या राजकुमार वैश्य यांना एमएची पदवी प्रदान करण्यात आली. नालंदा मुक्त विद्यापीठात मंगळवारी राजकुमार वैश्य यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांना स्नातकोत्तर पदवी देण्यात आली. पदवी स्वीकारण्यासाठी राजकुमार वैश्य हे व्हिलचेअरवर बसून आले होते. त्यांना बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी राजकुमार वैश्य यांनी तरुण पिढीला नेहमी प्रयत्न करत राहा, असा सल्ला दिला.
जिया हो बिहार के लाला... 98 वर्षीय राजकुमार वैश्य यांना एमएची पदवी प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 15:34 IST
पटना येथील नालंदा मुक्त विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी गेल्या सप्टेंबर महिन्यात वयाच्या 98 व्या वर्षी एमए (अर्थशास्त्र)च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या राजकुमार वैश्य यांना एमएची पदवी प्रदान करण्यात आली.
जिया हो बिहार के लाला... 98 वर्षीय राजकुमार वैश्य यांना एमएची पदवी प्रदान
ठळक मुद्देनालंदा मुक्त विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ मोठ्या दिमाखात पार पडलाराजकुमार वैश्य यांना एमएची पदवी प्रदान करण्यात आली. नेहमी प्रयत्न करत राहा, तरुण पिढीला सल्ला