झुडपी जंगलाची जमीनही वनक्षेत्रच; वनसंवर्धन कायदा लागू करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 07:16 IST2025-05-23T07:16:33+5:302025-05-23T07:16:33+5:30

महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात झुडपी जंगलाची जमीन आहे.

jhudapi is also a forest area supreme court directs to implement forest conservation act | झुडपी जंगलाची जमीनही वनक्षेत्रच; वनसंवर्धन कायदा लागू करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश

झुडपी जंगलाची जमीनही वनक्षेत्रच; वनसंवर्धन कायदा लागू करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क, दिल्ली/नागपूर : झुडपी जंगलाची जमीन वनक्षेत्रच आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जाहीर करून झुडपी जंगलाच्या जमिनीला वनसंवर्धन कायदा लागू करण्याचे निर्देश दिले. सरन्यायाधीश भूषण गवई व न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांनी हा निर्णय दिला.

महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात झुडपी जंगलाची जमीन आहे. ही जमीन महसूल विभागाच्या ताब्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाने दि. १२ डिसेंबर १९९६ व दि. १३ नोव्हेंबर २००० रोजी आदेश देत कोणत्याही वनजमिनीचा इतर कारणांसाठी उपयोग करण्यास वनसंवर्धन कायद्यानुसार केंद्र सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे, असे सांगितले होते. त्यामुळे नागपूर विभागीय आयुक्तांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.  

 

Web Title: jhudapi is also a forest area supreme court directs to implement forest conservation act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.