झारखंडमध्ये बुराडी कांडाची पुनरावृत्ती, एकाच घरातील सात जणांचे आढळले मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 14:09 IST2018-07-30T14:08:59+5:302018-07-30T14:09:19+5:30
राजधानी नवी दिल्लीतील बुराडी येथे एकाच घरातील 11 सदस्यांचे मृतदेह आढळल्याने देशभरात खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेची पुनरावृत्ती झारखंडमध्ये घडली आहे.

झारखंडमध्ये बुराडी कांडाची पुनरावृत्ती, एकाच घरातील सात जणांचे आढळले मृतदेह
रांची - राजधानी नवी दिल्लीतील बुराडी येथे एकाच घरातील 11 सदस्यांचे मृतदेह आढळल्याने देशभरात खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेची पुनरावृत्ती झारखंडमध्ये घडली आहे. झारखंडची राजधानी रांची येथील एका घरात सात जणांचे मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडले आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, तपास सुरू केला आहे.
संपूर्ण कुटुंबाचे अशा पद्धतीने मृतदेह सापडणे हे समजण्यापलीकडचे आहे. हे कुटुंब कनिष्ठ मध्यम वर्गातील होते. कुणासोबतही त्यांचा वाद नव्हता. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली हे सांगणे कठीण आहे, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.