शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

Jharkhand Political Crisis: झारखंडमध्येही काय झाडी, काय डोंगर...! सोरेन समर्थक आमदार बॅगा, साहित्य घेऊन आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 13:15 IST

Hemant Soren CM Seat in Problem: हेमंत सोरेन यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाण्याची शक्यता आहे. खाण लीज प्रकरणाच्या चौकशीनंतर निवडणूक आयोगाने आपला अहवाल झारखंडच्या राज्यपालांना पाठवला आहे.

झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या मुख्यमंत्री पदावर अपात्रतेची टांगती तलवार असताना आता तिथे सत्ता टिकविण्यासाठी कसरत सुरु झाली आहे. सोरेन यांनी आघाडीच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलविली आहे. या बैठकीला आमदार बॅगा भरून हजर होऊ लागले आहेत. यामुळे सोरेन आपल्या पक्षाच्या आमदारांसोबत आघाडीच्या आमदारांनाही दुसऱ्या राज्यात काय झाडी, काय डोंगर पाहण्यासाठी पाठविणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

सोरेन यांनी सर्व आमदारांची ११ वाजता बैठक बोलावली होती. या बैठकीला आलेल्या आमदारांच्या गाड्यांमध्ये बॅगा आणि इतर साहित्य दिसले आहे. झारखंडमधील यूपीएच्या आमदारांना छत्तीसगडमध्ये पाठवले जाऊ शकते. यूपीएचे मजबूत सरकार असलेल्या राज्यात आमदारांना पाठविले जाण्याची शक्यता आहे. 

हेमंत सोरेन यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाण्याची शक्यता आहे. खाण लीज प्रकरणाच्या चौकशीनंतर निवडणूक आयोगाने आपला अहवाल झारखंडच्या राज्यपालांना पाठवला आहे. त्यात मुख्यमंत्री हेमंत यांना आमदारपदासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. म्हणजेच त्यांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस केली आहे. सोरेन आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. सोरेन यांच्यानंतर त्यांची पत्नी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे. यामुळे सोरेन यांना पुन्हा एकदा बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सोरेन यांच्या निकटवर्तियाच्या ठिकाण्यांवर ईडीने काही दिवसांपूर्वीच छापे मारले होते. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?हेमंत सोरेन यांना रांची जिल्ह्यातील अनगडा ब्लॉकमध्ये 0.88 एकर जमिनीची खाण लीज मिळाली होती. कागदपत्रांनुसार, हेमंत सोरेन यांनी 28 मे 2021 रोजी अर्ज केला आणि त्याला 15 जून 2021 रोजी मंजुरी मिळाली. यानंतर 9 सप्टेंबर रोजी पर्यावरण विभागाकडे मंजुरी मागितली होती, ती 22 सप्टेंबरला मिळाली. 11 फेब्रुवारी 2022 रोजी, भाजपने राज्यपालांची भेट घेऊन तक्रार केली होती. यानंतर हेमंत सोरेन यांनी 11 फेब्रुवारी 2022 रोजी खाण पट्टा भाडेकरार परत केला होता. परंतू, त्याचे शुक्लकाष्ठ अद्याप मागे लागलेले आहे. 

टॅग्स :JharkhandझारखंडJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चा