शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
2
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
3
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
4
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
5
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
6
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
7
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
8
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
9
देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला
10
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
11
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
12
दमदार इंजिन अन् शानदार मायलेज; लॉन्च झाली नवीन मारुती Swift, जाणून घ्या किंमत...
13
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
14
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
15
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
16
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक
17
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
18
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
19
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
20
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा

राज्याची खबरबात! बंदुकीच्या ‘बुलेट’ला मिळणार ‘बॅलेट’ने उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 12:36 PM

दोन दशकांनंतर ११८पेक्षा अधिक बुथवर प्रथमच लोकसभेसाठी मतदान होणार

मनोज भिवगडेरांची : झारखंडमधील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात दोन दशकांपासून बंदुकीच्या जोरावर नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून रोखण्यात आले होते. विशेषतः पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील अशा ११८पेक्षा अधिक अतिसंवेदनशील बूथवर यंदा ‘बुलेट’ला ‘बॅलेट’ने उत्तर देण्यासाठी लोकसभा निवडणुकीकरिता प्रथमच १३ मे रोजी मतदान करून घेण्यासाठी प्रशासन, सुरक्षा दलाने जय्यत तयारी केली आहे.

बिहार राज्यातून वेगळे झालेल्या झारखंडची स्थापना १५ नोव्हेंबर २००० रोजी झाली. २४ जिल्ह्यांच्या या राज्यात तेव्हा १८ जिल्हे नक्षल प्रभावित होते. त्यापैकी बहुतांश जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी टोकाची भूमिका घेत निवडणुकीदरम्यान मतदान होऊ दिले नाही. अतिदुर्गम भागात असलेल्या बूथपर्यंत तर पोहोचणेही शक्य नव्हते. मात्र, गेल्या काही वर्षांत नक्षल चळवळ मोडून काढण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या स्तरावरून करण्यात आलेल्या प्रयत्नामुळे आता झारखंडमध्ये ज्या भागात कधीही ज्यांच्या बोटावर शाई लागली नाही, तेथील नागरिकही लोकशाहीच्या उत्सवात यंदा निर्भीडपणे सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत.

आठ जिल्हे अतिनक्षल प्रभावितnझारखंडमध्ये कधीकाळी २४ पैकी १८ जिल्हे नक्षल प्रभावित होते. या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नक्षली कारवाया होत आल्यात. आता ही संख्या घटून आठवर आली आहे.nअतिनक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये चतरा, लातेहार, लोहरदगा, गुमला, खुंटी, सरायकेला, पश्चिम सिंहभूम आणि गिरीडीह या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे.

अतिसंवेदनशील बुथची संख्या घटलीबुथचे प्रकार    २०१९    २०२४    घट-वाढअतिसंवेदनशील    १,८६१    १,४२२    ४३९ बूथ कमी झालेसंवेदनशील    ३,४७०    ९,२६५    ५,७९५ बूथ वाढलेसामान्य    २५,९९४    २०,२५६    ५,७३८ बूथ कमी झाले

गत लोकसभा निवडणुकीत काय झाले?

झारखंडमध्ये २०१९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षली पथकांकडून अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले होते.लातेहार येथे निवडणूक बंदोबस्तावर असलेल्या सुरक्षारक्षकांवर हल्ला करण्यात आला होता.

पलामू येथे निवडणुकीच्या कामात बाधा आणण्याचा प्रयत्न करीत पोलिंग पार्टीवरच हल्ला करण्यात आला.रांची, लोहरदगा येथे उमेदवारांचीप्रचार वाहने पेटविण्याच्या घटना घडल्या होत्या.रांची, लोहरदगा येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसोबत नक्षल्यांची चकमक उडाली होती.

टॅग्स :lok sabhaलोकसभाJharkhandझारखंडElectionनिवडणूकnaxaliteनक्षलवादी