शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

झारखंड निवडणूक 2019: बिशुनपूरमध्ये मतदान सुरू असताना नक्षली हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 12:19 IST

Jharkhand Election 2019: झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे.

ठळक मुद्देझारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मतदानादरम्यान बिशुनपूर येथे नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे.नक्षलवाद्यांनी एक पूल उद्ध्वस्त केला आहे.

रांची - झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. या टप्प्यात चत्रा, बिशुनपूर, लातेहार, गुमला, लोहरदगा, पनकी, माणिका, विश्रामपूर, हुसेनाबाद, डाल्टनगंज, छतरपूर, भवनाथपूर, गढवा या जागांसाठी मतदान होणार आहे. या जागांवर एकूण 189 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. शनिवारी (30 नोव्हेंबर) मतदान सुरू असताना नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. मतदानादरम्यान बिशुनपूर येथे नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिशुनपूरमध्ये नक्षलवाद्यांनी एक पूल उद्ध्वस्त केला आहे. मात्र, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलीस उपायुक्त शशी रंजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवादी हल्ल्यामुळे मतदानावर परिणाम झालेला नाही. मतदान अजूनही सुरू आहे. झारखंड पाच टप्प्यात मतदान होणार आहे, पहिला टप्पा 30 नोव्हेंबरला आणि शेवटचा टप्पा 20 डिसेंबरला असणार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान होईल. 

पहिल्या टप्प्यात नक्षलग्रस्त भाग असल्याने मतदानाची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत ठेवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. येथे 37,83,055 मतदार नक्षलग्रस्त 6 जिल्ह्यातील 13 विधानसभा जागांवर 189 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. भवनाथपूर मतदारसंघातून जास्तीत जास्त 28 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. लातेहार आणि माणिका येथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी येथे नक्षलवादी हल्ला झाला होता. शनिवारी या ठिकाणी शांततेत मतदान होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

81 सदस्यांच्या झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने 65 जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले असले, तरी या पक्षाला बहुरंगी लढतींचा मुकाबला करावा लागत आहे. भाजपाला सत्ता टिकवण्यासाठी ही महत्त्वपूर्ण लढत द्यायची असून, आता एकाच वेळी अनेकांशी दोन हात करावे लागणार आहेत. अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेशी (एजेएसयू) पक्षाचे मतभेद झालेले असून, ते दूर करण्यात अद्याप यश मिळालेले नाही. त्यातच एनडीएचे सहकारी पक्ष जदयू आणि लोजपा हे स्वबळावर लढत आहेत. महागठबंधनचे आव्हान वेगळेच आहे. लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांनी स्वबळावर 50 जागा लढवण्याची घोषणा नुकतीच केल्याने भाजपला झटका बसला आहे. या निवडणुकीत युती करण्यासाठी आम्ही विचारले असता भाजपकडून काहीच उत्तर आले नव्हते. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. जदयूने सर्वप्रथम स्वबळावर लढण्याची घोषणा करून भाजपाची कोंडी केली.

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस