'माझ्या बॉयफ्रेंडला बोलवून घ्या नाहीतर...' दारू पिऊन हाय टेन्शन टॉवरवर चढली लेडी वीरू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 13:33 IST2025-08-27T13:33:04+5:302025-08-27T13:33:55+5:30
झारखंडमधील जमशेदपूरमधून एक विचित्र प्रकार समोर आला असून एक तरुणी दारू पिऊन हाय टेन्शन टॉवरवर चढली.

'माझ्या बॉयफ्रेंडला बोलवून घ्या नाहीतर...' दारू पिऊन हाय टेन्शन टॉवरवर चढली लेडी वीरू!
झारखंडमधील जमशेदपूरमधून एक विचित्र प्रकार समोर आला. दारू पिऊन एक तरूणी हाय टेन्शन टॉवरवर चढली. रस्त्यांनी जाणाऱ्या लोकांनी तिला पाहिल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला. सुमारे १०० फूट उंचीवर पोहोचल्यानंतर संबंधित तरुणी तिच्या प्रियकराला वारंवार फोन करत होती. माझ्या प्रियकराला बोलावास नाही तर उडी मारेल, अशी तिने धमकी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार जमशेदपूरच्या मरीन ड्राइव्ह परिसरात घडला. संबंधित तरुणी दारू पिऊन हाय टेन्शन टॉवरवर चढली आणि वारंवार तिच्या प्रियकराला फोन करत राहिली. स्थानिक लोकांसह, पोलिस विभागानेही तिला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तरीही तरुणी खाली उतरली नाही. प्रियकर आल्यावरच खाली उतरेल, असे ती बोलत होती. सुमारे दोन तास मुलगी खाली न आल्याने बचाव पथकाने टाटा स्टील कंपनीच्या क्रेनच्या मदतीने मुलीला सुरक्षितपणे खाली आणले.
सुमारे दोन तास मुलगी खाली न आल्याने बचाव पथकाने टाटा स्टील कंपनीच्या क्रेनच्या मदतीने मुलीला सुरक्षितपणे खाली आणले.
ही तरुणी कोण आहे, कुठे राहते? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. खाली येताच तरुणी बेशुद्ध झाली. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस स्टेशनचे प्रभारी कुमार सरयू आनंद दिली. तरुणीच्या या कृत्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.