शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

"आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन", फ्लोर टेस्टपूर्वी हेमंत सोरेन यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 1:49 PM

Jharkhand floor test : ३१ जानेवारीला घडलेल्या घटनेची कथा २०२२ पासून लिहिली जात होती, असा आरोप फ्लोर टेस्टपूर्वी हेमंत सोरेन यांनी केला. 

Jharkhand floor test : झारखंडमधील राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. झारखंडमधील चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील फ्लोर टेस्टदरम्यान उपस्थित आहेत. झारखंडमध्ये जे काही घडले, त्यात राजभवनाचाही हात होता. मी आदिवासी आहे, मला नियम-कायद्यांची नीट जाण नाही. ३१ जानेवारीला घडलेल्या घटनेची कथा २०२२ पासून लिहिली जात होती, असा आरोप फ्लोर टेस्टपूर्वी हेमंत सोरेन यांनी केला. 

"मी आदिवासी आहे, त्यामुळेच मला टार्गेट केले जात आहे. पहिल्यांदाच देशाच्या मुख्यमंत्र्यांना अटक झाली आहे. मी हार मानली नाही. आदिवासी दलितांबद्दल द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात आहे. आम्हाला जंगलात जाण्यास सांगितले जात आहे. जर ते शक्य झाले तर ते आम्हाला जंगलात पाठवतील. मी अश्रू ढाळणार नाही. जमीन माझ्या नावावर आहे, हे सिद्ध करण्यासाठी मी माझे अश्रू सावरीन. माझ्यावरील घोटाळ्याचे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेन. मला तुरुंगात डांबून त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ शकणार नाहीत", असे हेमंत सोरेन म्हणाले.

हेमंत असेल तर हिंमत आहे - चंपाई सोरेनतत्पूर्वी, राज्याचे नवे मुख्यमंत्री चंपाई सोरेन म्हणाले, "विरोधकांनी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. कोरोना महामारीत हेमंत सोरेन सरकारने चांगले काम केले. हेमंत सोरेन यांच्या सक्षम नेतृत्वाखाली झारखंड पुढे गेले. हेमंत असेल तर हिंमत आहे. ज्या कुटुंबात शिक्षणाचा दिवा कधीच पेटला नाही, अशा कुटुंबात आम्ही दिवा लावू. हे चुकीचे आहे का? केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. हेमंत सोरेन यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. आमच्या योजना कोणीही पुसून टाकू शकत नाही. आम्ही अभिमानाने सांगू की, आम्ही भाग-२ आहोत."

किती आहे बहुमताचा आकडा? ८१ सदस्यीय झारखंड विधानसभेत बहुमताचा आकडा ४१ आहे. आघाडीचा विचार केला तर चंपाई सरकारकडे या किमान बहुमताच्या आकड्यापेक्षा पाच अधिक आमदार आहेत. विधानसभेच्या ८१ जागांपैकी एक जागा रिक्त आहे, त्यामुळे ८० जागांची मोजणी केल्यानंतर बहुमताचा आकडा ४१ आहे. दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चाने दावा केला आहे की, त्यांच्याकडे पुरेशी संख्या आहे. फ्लोर टेस्टमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. विधानसभेत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (ML) एकूण ४६ आमदार आहेत. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे २८, काँग्रेसचे १६, आरजेडीचा एक आणि सीपीआय (एमएल)च्या एका आमदारांचा समावेश आहे. विरोधी पक्ष भाजपा आणि मित्रपक्षांकडे एकूण २९ आमदार आहेत. 

टॅग्स :JharkhandझारखंडFloor Testबहुमत चाचणी