शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडमध्ये गेल्या 19 वर्षांत कुठल्याही राजकीय पक्षाला तोडता आलेली नाहीत ही मिथके

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 16:34 IST

झारखंड राज्याची स्थापना झाल्यापासून गेल्या 19 वर्षांमध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये दोन मिथके तोडणे कुठल्याही राजकीय पक्षाला शक्य झालेले नाही. 

रांची -  झारखंड विधानसभा निवडणुकीचा कल आता जवळपास स्पष्ट होत आला आहे. संपूर्ण निकाल अद्याप हाती आला नसला तरी आतापर्यंतच्या कलांमधून भाजपाचा पराभव होणार असल्याचे आणि सर्वात मोठी आघाडी ठरलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद आघाडीचे राज्यात सरकार स्थापन होणार असल्याचे जळपास निश्चित झाले आहे. मात्र राज्याची स्थापना झाल्यापासून गेल्या 19 वर्षांमध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये दोन मिथके तोडणे कुठल्याही राजकीय पक्षाला शक्य झालेले नाही. ती मिथके म्हणजे झारखंडमधील विधानसभा निवडणुकीती यावेळीसुद्धा कुठल्याही राजकीय पक्षाला  स्वबळावर बहुमत मिळवता आलेले नाही. एकीकडे स्बबळावर बहुमतासह सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. तर सत्तेसमिप पोहोचलेल्या झारखंड मुक्ती मोर्चालाही बहुमत मिळालेले नाही. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल आघाडी 47 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा 24 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरे मिथक म्हणजे झारखंडमध्ये गेल्या 19 वर्षांत झारखंडमध्ये कुठलाही पक्ष सत्ता कायम राखू शकलेला नाही. भाजपा नेते रघुवर दास हे संपूर्ण पाच वर्षे झारखंडचे मुख्यमंत्रिपद सांभाळवणारे पहिले व्यक्ती ठरले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात पक्ष सत्तेत पुनरागमन करेल अशी अपेक्षा भाजपा नेत्यांना होती. मात्र प्रत्यक्षात पक्षाला पराभव पत्करावा लागला. देशात मोदी लाट जोरात असताना 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला झारखंडची सत्ता काबीज करण्यात यश आले होते. मात्र तेव्हाही भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवता आले नव्हते. त्या निवडणुकीत भाजपाला 37 तर सहकारी पक्ष एसलेल्या एजेएसयू ला 5 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर झारखंड विकास मोर्चाच्या 6 आणि एका अपक्ष आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाला बहुमताचा आकडा पार करता आला होता.  झारखंडमध्ये विधानसभेची पहिली निवडणूक 2005 मध्ये झाली होती. त्या निवडणुकीत भाजपा 30 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर झारखंड मुक्ती मोर्चाला 17 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपा आणि झारखंड मुक्ती मोर्चाला प्रत्येकी 18 जागा तर काँग्रेसला 14 आणि जेव्हीएमला 11 जागा मिळाल्या होत्या.  

टॅग्स :jharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019BJPभाजपाJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चाcongressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल