शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Jharkhand Cash Recovery : कॅश कांडमध्ये काँग्रेसच्या 3 आमदारांसह 5 जणांना अटक, पक्षानंही केलं निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 15:24 IST

महत्वाचे म्हणजे, हे तीन आमदार पकडले गेल्यानंतर, काँग्रेसने भाजपवर झारखंडमधील त्यांचे झारखंड मुक्ती मोर्चासोबत (JMM) असलेले आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला होता.

झारखंडमधीलकाँग्रेसच्या (Congress) तीन आमदरांकडून पश्चिम बंगालमधील (West Bengal) हावडा येथे मोठ्या प्रमाणावर कॅश जप्त करण्यात आली होती. या तीनही आमदरारांना काँग्रेसने रविवारी निलंबित केले. तसेच पोलिसांनीही या आमदारांना अटक केली आहे. दीर्घ चौकशीनंतर, पोलिसांनी त्यांना अटक केली. महत्वाचे म्हणजे, हे तीन आमदार पकडले गेल्यानंतर, काँग्रेसने भाजपवर झारखंडमधील त्यांचे झारखंड मुक्ती मोर्चासोबत (JMM) असलेले आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला होता.

काँग्रेसने तीन आमदारांना केलं निलंबित -यासंदर्भात, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी संबंधित तीनही आमदारांना तत्काळ निलंबित केले आहे, अशी माहिती काँग्रेसचे झारखंड प्रभारी अविनाश पांडे यांनी दिली आहे. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.

कारमधून हस्तगत करण्यात आली होती कॅश - विशेष माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी शनिवारी एक एसयूव्ही रोखली होती. यात हावडाच्या रानीहाटीमधील काँग्रेस आमदार इरफान अंसारी, राजेश कच्छप आणि नमन बिक्सल कोंगारी होते. नॅशनल हायवे-16 वरवर ही कारवाई करण्यात आली. या गाडीत मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली होती. 

आणखी दोन लोक होते कारमध्ये -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित एसयूव्हीमध्ये आमदारांशीवाय दोन इतर लोकही उपस्थित होते. या कारच्या एका बोर्डवर काँग्रेसच्या निवडणूक चिन्हासह, ‘आमदार जामताडा झारखंड’, असे लिहिण्यात आलेले होते. इरफान अंसारी जामताडा, तर राजेश कच्छप रांची जिल्ह्यातील खिजरी आणि बिक्सल कोंगारी सिमडेगा कोलेबिरा येथील आमदार  आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसCorruptionभ्रष्टाचारJharkhandझारखंडPoliceपोलिसMLAआमदार