शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Jharkhand Election: मोदी-शहांकडून प्रचार, समोर मुख्यमंत्री उमेदवार; तरीही अपक्षासमोर भाजपाची हार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 10:15 IST

भाजपाची प्रचार यंत्रणा, मुख्यमंत्र्यांचा करिश्मा, मोदींची झंझावाती सभा बंडखोर उमेदवारासमोर फेल

रांची: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झंझावाती प्रचार, समोर मुख्यमंत्री रघुवर दास यांच्यासारखा तगडा उमेदवार, झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या महाआघाडीचं आव्हान यांचा सामना करत बंडखोर उमेदवार सरयू राय यांनी जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून विजय मिळवला. जमशेदपूर पश्चिम मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात आल्यानं सरयू राय यांनी बंडखोरी केली. मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी असलेल्या राय यांनी थेट त्यांच्याच जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करत आव्हान उभं केलं. सरयू राय त्यांच्या सिद्धांतांसाठी ओळखले जातात. त्यामुळेच त्यांनी त्यांच्याच सरकारविरोधात भूमिका घेत बंडखोरी केली. रघुवर दास नाहीत, तर डाग आहेत. हा डाग पंतप्रधान मोदींची डिटर्जंट आणि अमित शहांची लॉन्ड्रीदेखील धुवू शकत नाही, असं म्हणत राय यांनी दास यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. रघुवर दास यांच्या मंत्रिमंडळात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून काम केलेल्या राय यांनी दास यांचा करिश्मा, मोदींची प्रचार यंत्रणा आणि तीन पक्षांच्या महाआघाडीला एकहाती टक्कर दिली. जमशेदपूर पूर्व मतदारसंघ रघुवर दास यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांनी १९९५ पासून या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यामुळे सलग सहाव्यांदा जिंकून डबल हॅट्ट्रिक साधण्याचा विश्वास त्यांना होता. त्यातच मोदींनीदेखील त्यांच्यासाठी सभा घेतल्यानं त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. दास यांच्या प्रचारासाठी खुद्द अमित शहांनीदेखील ताकद पणाला लावली. गेल्या निवडणुकीत जमशेदपूर पश्चिम मतदारसंघातून विजयी झाल्यानं सरयू राय यांच्यासाठी मतदारसंघ नवा होता. याशिवाय त्यांच्यासाठी परिस्थिती प्रतिकूल होती. मात्र तरीही त्यांनी सर्व आघाड्यांवर भाजपाला धक्का दिला आणि मुख्यमंत्र्यांचा पराभव करत मोदी-शहांसोबत सगळ्यांनाच धक्का दिला. 

टॅग्स :JharkhandझारखंडNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपा