शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

"तुम्ही गोंधळ घालूनच दाखवा, मग मी पण बघतो..."; झारखंडच्या प्रचारसभेत हिमंता सरमा गरजले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 13:36 IST

Jharkhand Assembly Election 2024, BJP Himanta Biswa Sarma on Hindu vs Muslim: जेव्हा हिंदू एकसंध राहतो, तेव्हा कुठलाही गोंधळ होत नाही, असेही ते म्हणाले.

Jharkhand Assembly Election 2024, BJP Himanta Biswa Sarma on Hindu vs Muslim: झारखंड विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. भाजपाचे झारखंड निवडणूक सहप्रभारी व आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राज्यातील एका निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना हेमंत सोरेन सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, JMM-काँग्रेसचा उद्देश हिंदूंच्या मतांचे जातीच्या आधारावर विभाजन करणे आणि एका विशिष्ट समुदायाची १००% मते घेणे हाच आहे. झारखंडमध्ये जे काही चालले आहे, ते असेच चालू राहिले तर भविष्यात हिंदूंची लोकसंख्या ५० % होईल आणि घुसखोरांची लोकसंख्याही जवळपास सारखीच होईल. त्यामुळे ही निवडणूक आपल्या अस्मितेची निवडणूक आहे. घुसखोरांना हुसकावून लावणे आपल्याला गरजेचे आहे.

गोंधळ घालूनच दाखवा, मी पण बघतो...

आसामचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "आसाममधील काही लोक म्हणत होते की आम्ही मदरसा बंद करू शकणार नाही. मी म्हणालो की भारताला सध्या मुस्लीम धर्मगुरूंची नव्हे तर डॉक्टर-इंजिनियरची गरज आहे. त्यावर ते म्हणत होते की, असे केले तर गदारोळ-गोंधळ होईल. मी त्यांना ठणकावून सांगितले की, मला एकदा तुम्ही गोंधळ घालूनच दाखवा, मग मी पण बघतो कोण कसा गोंधळ घालतो. त्यानंतर मदरसे बंद होते, पण कोणताही गोंधळ झाला नाही. राम मंदिर बांधण्याच्या वेळीही हे लोक असंच म्हणत होते की गोंध-गदारोळ होईल, पण काय झालं? जेव्हा हिंदू एकसंध राहतो, तेव्हा कुठलाही गोंधळ, गदारोळ होत नाही."

इंडिया आघाडीने हिमंता यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे केली तक्रार

भाजपाचे झारखंड निवडणूक सहप्रभारी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या विधानावर विरोधी इंडिया ब्लॉकने आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून सरमा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. INDIA ब्लॉकच्या शिष्टमंडळाने झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी रवी कुमार यांची रांची येथे भेट घेतली आणि हिमंता बिस्वा सरमा यांच्या कथित प्रक्षोभक आणि फुटीरतावादी भाषणांसाठी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

टॅग्स :jharkhand lok sabha election 2024झारखंड लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चाHinduहिंदू