शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

JEE-NEET : 'परीक्षेला विलंब झाला तर…', जगभरातील १५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञांचं नरेंद्र मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 17:16 IST

भारतासह जगभरातील विद्यापीठांच्या १५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञांनी या परीक्षांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे"काही लोक आपल्या राजकीय अजेंड्याला पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्य़ांच्या भविष्यासोबत खेळत आहेत. तरूण आणि विद्यार्थी वर्ग हे देशाचे भविष्य आहे."

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एकीकडे केंद्र सरकार लोकांना घरी राहण्याचा सल्ला देत आहे, तर दुसरीकडे जेईई (मेन) आणि नीट परीक्षा देखील घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा घेण्याच्या निर्णयावरुन सध्या केंद्र सरकारवर टीका होत आहे. तसेच, अनेक राजकीय पक्षांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. 

दरम्यान, भारतासह जगभरातील विद्यापीठांच्या १५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञांनी या परीक्षांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. जर वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षा जेईई (मेन) आणि नीट या परीक्षांना अजून विलंब झाला तर विद्यार्थ्यांच्या भविष्यावर याचा विपरीत परिणाम होईल, असे शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

याचबरोबर, काही लोक आपल्या राजकीय अजेंड्याला पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्य़ांच्या भविष्यासोबत खेळत आहेत. तरूण आणि विद्यार्थी वर्ग हे देशाचे भविष्य आहे. मात्र, त्यांच्या पुढील वाटचालीवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. प्रवेशाबाबत आणि अन्य प्रक्रियांबाबत अनेक शंका असून त्या लवकरात लवकर सोडवल्या गेल्या पाहिजेत, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली आहे. आता ते प्रवेश परीक्षांची वाट पाहत आहेत. सरकारने जेईई (मेन) आणि नीटच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. परीक्षेचे आयोजन करण्यात होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या बहुमोल असं वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. आपले तरूण आणि विद्यार्थी यांची स्वप्न आणि त्यांचे भविष्य यावर कोणतीही तडजोड होता कामा नये. काही लोक केवळ आपला राजकीय अजेंडा चालवण्यासाठी आणि सरकारचा विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रत्न करत आहेत, असे या पत्रात म्हटले आहे.

याशिवाय, केंद्र सरकार संपूर्ण सुरक्षेची काळजी घेऊन जेईई (मेन) आणि नीट परीक्षांचे आयोजन करेल. मात्र, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून २०२०-२१ या वर्षासाठी अॅकॅडमिक कॅलेंडर तयार केले पाहिजे, असेही या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविलेल्या या पत्रावर दिल्ली विद्यापीठ, इग्नू, लखनौ विद्यापीठ, जेएनयू, बीएचयू, आयआयटी दिल्ली, लंडन विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठ, हिब्रू विद्यापीठ आणि इस्रालयच्या बेन गुरियन विद्यापीठातील प्राचार्यांनी स्वाक्षरी केली आहे.

"मोदीजी, तुमच्याप्रमाणे विद्यार्थी 8000 कोटींच्या विमानातून परीक्षा द्यायला जात नाहीत"माजी खासदार पप्पू यादव यांनी जेईई (मेन) आणि नीटपरीक्षा घेण्याच्या मुद्द्यावरून ट्विटद्वारे मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. "नरेंद्र मोदीजी, विद्यार्थी तुमच्याप्रमाणे आठ हजार कोटींच्या चार्टर्ड प्लेनमधून IIT आणि NEET ची परीक्षा द्यायला जात नाही. ते ट्रेन आणि बसच्या गर्दीतून प्रवास करतात, ज्या अद्याप सुरु झालेल्या नाहीत. तर आपल्याला एवढीशी गोष्ट समजत नाही का, हे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी केंद्रावर कसे जाणार. माल (पैसा) घेऊन त्यांच्या (विद्यार्थ्यांच्या) जीवाचा शत्रू का होत आहात?", असे ट्विट पप्पू यादव यांनी केले आहे.

आणखी बातम्या...

उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपाशासित राज्यांचे नेतृत्व करावे- संजय राऊत

घर घेणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा दिलासा, 31 डिसेंबरपर्यंत स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात  

Accenture पाच टक्के कर्मचारी कपात करणार, भारतीय स्टाफवरही होणार परिणाम  

"मोदीजी, तुमच्याप्रमाणे विद्यार्थी 8000 कोटींच्या विमानातून परीक्षा द्यायला जात नाहीत"

'सुशांत सिंह राजपूतवर विषप्रयोग?', भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट

आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...    

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीexamपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षण