JEE Advanced Result 2020 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, असा करा चेक

By सायली शिर्के | Published: October 5, 2020 12:25 PM2020-10-05T12:25:05+5:302020-10-05T12:35:55+5:30

JEE Advanced Result 2020 : विद्यार्थी JEE Advanced च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून आपला निकाल पाहू शकतात. 

JEE Advanced Result iit delhi released resul process admission in iits start october 6 | JEE Advanced Result 2020 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, असा करा चेक

JEE Advanced Result 2020 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, असा करा चेक

Next

नवी दिल्ली - इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, दिल्ली (IIT) कडून जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 (JEE Advanced 2020) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा एकूण 1.6 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी 96 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. JEE Advanced च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. 

असा चेक करा निकाल

- सर्वप्रथम jeeadv.ac.in या वेबसाईटवर लॉग इन करा. 

- होम पेजवर देण्यात आलेल्या JEE Advanced result 2020 वर क्लिक करा.

- स्क्रिनवर एक नवीन पेज ओपन होईल. त्यावर विचारलेली माहिती भरा.

- JEE Advanced result स्क्रिनवर दिसेल.

- रिझल्ट डाऊनलोड करुन सेव्ह करा आणि त्याची प्रिंटआऊटही काढा.


आयआयटीमध्ये प्रवेश प्रक्रिया झाली सुरू 

JEE Advanced चा निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरातील 23 आयआयटीमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. निकालानंतर आता आयआयटी आपली कटऑफ प्रसिद्ध करतील. 6 ऑक्टोबरपासून विद्यार्थी त्यांच्या कटऑफ स्कोअरनुसार आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी समुपदेशनात (काउंसलिंग) भाग घेऊ शकतात.

27 सप्टेंबर रोजी घेण्यात आली होती परीक्षा 

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे दोन वेळा JEE Advancedची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र अखेर ती 27 सप्टेंबर रोजी घेण्यात आली. 222 शहरांमधील 1000 परीक्षा केंद्रावर ती घेण्यात आली होती. 1.60 लाख विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज केला होता. 

JEE Advanced परीक्षेचा निकाल जाहीर; आयआयटी मुंबई झोनचा चिराग अव्वल

आयआयटी दिल्लीकडून जेईई अ‍ॅडव्हान्स्डचा निकाल जाहीर करण्यात आला असून आयआयटी मुंबई झोनमधून चिराग फेलोर याने प्रथम क्रमांक पटकावण्यात यश मिळविले आहे. चिरागला 396 पैकी 352 गुण मिळाले आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आयआयटी मद्रासचा गांगूला भुवन रेड्डी तर आयआयटी दिल्लीचा वैभव राज यांनी स्थान मिळवण्यात यश मिळवले आहे. जेईई अ‍ॅडव्हान्स्डमध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी आता देशातील आयआयटी, एनआयटी आणि अन्य संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरले आहेत.

मुंबई झोनमधून नियती मेहता ही विद्यार्थिनी मुलींमधून प्रथम

आयआयटी मुंबई झोनमधून नियती मेहता ही विद्यार्थिनी मुलींमधून प्रथम आली असून तिला निकालात 62 वे स्थान मिळाले आहे. आयआयटी मुंबई झोनमधून पहिल्या पाच स्थानावर चिराग फेलोर(1), आर महेंदर राज (4), वेदांग आसगावकर (7), स्वयं चुबे (8) आणि हर्ष शाह (11) यांना स्थान मिळाले आहे.  जेईई मधील टॉप 100 विद्यार्थ्यांमध्ये आयआयटी मुंबई झोनमधून 24 , टॉप 200 मध्ये 41, टॉप 300 मध्ये 63 , टॉप 400 मध्ये 82 तर टॉप 500 मध्ये 104 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

 

Web Title: JEE Advanced Result iit delhi released resul process admission in iits start october 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.