जीन्स, स्कर्ट घातल्यामुळे चौघींना बेदम मारहाण

By Admin | Updated: April 3, 2017 14:33 IST2017-04-03T13:30:08+5:302017-04-03T14:33:20+5:30

जीन्स आणि स्कर्ट घातल्यामुळे चार मुलींना बेदाम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाझियाबाद मधील मुरादनगर येथील हा धक्कादायक आहे.

Jeans, putting a skirt to the four-legged assassination | जीन्स, स्कर्ट घातल्यामुळे चौघींना बेदम मारहाण

जीन्स, स्कर्ट घातल्यामुळे चौघींना बेदम मारहाण

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - केवळ जीन्स आणि स्कर्ट घातले म्हणून चार मुलींना बेदाम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाझियाबाद मधील मुरादनगर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका  मैत्रिणीच्या वडिलांच्या मृत्यूनंतर शोकसभा आयोजित करण्यात आली होती. त्या शोकसभेत या चौघी जीन्स व स्कर्ट घालून सहभागी झाल्या होत्या.

यावेळी ग्रामस्थांनी त्यांना शोकसभेला जीन्स व स्कर्ट कसे घालून येऊ शकता, असा प्रश्न विचार एका घरात कोंडलं व बेदम मारहाण केली. दरम्यान, याची माहिती मिळाल्यानंतर तब्बल एक तासानंतर पोलिसांनी या चौघींची ग्रामस्थांच्या तावडीतून सुटका केली. 

"दैनिक जागरण"च्या वृत्तानुसार, शुक्रवारी मुरादनगरजवळील पुर्सी गावात ही घटना घडली. पुर्सीतील रहिवासी पवन (42) यांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी त्यांचे पत्नीचे अकाली निधन झाले. आईवडिलांच्या निधनामुळे या चौघींची मैत्रीण मुस्कान (18) दु:खी होती. आपल्या मैत्रिणीच्या दुःखात सहभागी होण्यासाठी रश्मी, नितू अन्य दोन मैत्रिणींसोबत तिच्या घरी पोहोचल्या. यातील एका मुलीने स्कर्ट व तिघींनी जीन्स-टॉप परिधान केले होते.  

याचवेळी मुस्कानचे शेजारीही तिच्या घरी आले होते. यावेळी शेजा-यांनी या चौघींनी त्यांच्या कपड्यांवर हटकायला सुरुवात केली. विरोध करत त्या चौघींना घरातून बाहेर जाण्यास सांगितले. यावर चौघींनी नकार देता ग्रामस्थांनी त्यांना एक घरात कोंडलं.

या सर्व प्रकाराला मुस्कानेनंही विरोध केला. पण ग्रामस्थांनी तिच्या विरोधाला जुमानलं नाही. यानंतर मुस्काननं शक्कल लढवत मैत्रिणींच्या कुटुंबीयांना फोन लावला व घडला प्रकार सांगितला. मुस्कानच्या सांगण्यावरुन मुलींच्या कुटुंबीयांना पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर तब्बल एक तासानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व चार जणींची सुटका केली.

Web Title: Jeans, putting a skirt to the four-legged assassination