शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

"...म्हणून मुस्लिमांची कामे करणार नाही"; नाश्ता करुन जा म्हणत खासदाराने व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 18:40 IST

जेडीयूचे नवनिर्वाचित खासदार देवेशचंद्र ठाकूर सीतामढी लोकसभा मतदारसंघातील यादव आणि मुस्लिमांवर नाराजी व्यक्त केली.

JDI MP Devesh Chandra Thakur : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात एनडीएचे सरकार स्थापन झालं असून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत. एनडीएमध्ये नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड या पक्षाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे.त्यामुळे सत्ता स्थापनेत नितीश कुमार यांच्या पक्षाचे वजन जास्त होतं. मात्र आता नितीश कुमार यांच्या पक्षाच्या खासदाराने केलेल्या एका वक्तव्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मला मतदान केलं नाही म्हणून मी मुस्लिम आणि यादव समाजाची कामे करणार नाही असं जेडीयूच्या खासदाराने म्हटलं आहे. कमी मतांनी विजयी झालेल्या खासदाराने आपली नाराजी काम न करणार असल्याचे सांगून व्यक्त केली आहे.

"जेडीयूचे नवनिर्वाचित खासदार देवेशचंद्र ठाकूर यांनी सीतामढीतील एका कार्यक्रमादरम्यान मुस्लिम आणि यादवांसाठी कोणतेही काम करणार नसल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीत या समाजाची मते न मिळाल्यामुळे देवेशचंद्र ठाकूर दुखावले गेले होते. त्यामुळे देवेशचंद्र ठाकूर यांनी व्यासपीठावरुनच ही घोषणा केली.२२ वर्षे राजकारणात सक्रिय असताना यादव आणि मुस्लिम समाजासाठी सर्वाधिक काम केले. मात्र या लोकांनी विनाकारण मला या निवडणुकीत मतदान केले नाही," असे देवेशचंद्र ठाकूर म्हणाले.

"भविष्यात या समाजातील लोक कामासाठी आले तर त्यांना चहा-नाश्ता नक्कीच देईल पण त्यांची कामे करणार नाही. ज्यांना यायचे आहे, यावे, चहा-नाश्ता करून जावे पण मदतीची अपेक्षा करू नका. माझ्याकडे  सर्वात जास्त वैयक्तिक काम कोणत्याही समाजाची झाली असतील तर ती मुस्लिम आणि यादव समाजाची आहेत. आम्ही भाजपशी संबंधित आहोत म्हणून तुम्ही आम्हाला मतदान करणार नाही का? तुम्हाला पंतप्रधान मोदींचा चेहरा दिसतो का? हे चुकीचे आहे. पंतप्रधान मोदींनी जात-धर्माचा विचार न करता सर्वांना धान्य दिले आहे," असेही देवेशचंद्र ठाकूर यांनी म्हटलं.

देवेशचंद्र ठाकूर यांनी सीतामढीमधून लोकसभा निवडणूक जिंकली आहे. देवेशचंद्र ठाकूर हे बिहार विधान परिषदेचे अध्यक्षही आहेत. यासोबत ठाकूर यांनी कुशवाह समाजावरही भाष्य केलं. "कुशवाह समाज इतका स्वार्थी झाला आहे का? या समाजाचे सरकारमध्ये भाजपचे एक उपमुख्यमंत्री आहेत, जर उपेंद्र कुशवाह विजयी झाले असते तर ते आज केंद्रीय मंत्री झाले असते, सीतामढीतील कुशवाह समाजाचे लोक काम करून घेण्यासाठी येतील का? त्यांची विचारसरणी किती विकृत झाली आहे," असे देवेशचंद्र ठाकूर म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Janta Dal Unitedजनता दल युनायटेडlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपा