शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

94 कोटींचे दागिने, खात्यात 130 कोटी अन्...; एवढ्या कोटींचे मालक आहेत अमिताभ-जया बच्चन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 16:03 IST

जया बच्चन यांना 'सपा'ने पाचव्यांदा राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली.

Jaya Bachchan wealth : बॉलिवूड अभिनेत्री आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन  (Jaya Bachchan) पाचव्यांदा राज्यसभेवर (RajyaSabha Election) जात आहेत. त्यांना यापूर्वी चारवेळी समाजवादी पक्षाने (SP) राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. आता पुन्हा एकदा त्या सपाकडून राज्यसभेत जात आहेत. त्यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती दिली.

जया बच्चन यांच्याकडे कोट्यवधीची संपत्तीजया बच्चन यांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली. त्यानुसार, 75 वर्षीय जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्याकडे एकूण 1578 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. यामध्ये 2022-23 या आर्थिक वर्षातील दोघांची कमाई नमूद करण्यात आली आहे. या कालावधीत जया बच्चन यांची कमाई 1,63,56,190 रुपये होती, तर अमिताभ बच्चन यांची रु. 273,74,96,590 होती.

बँक खात्यात कोट्यावधी, विमा पॉलिसी नाहीनिवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, जया बच्चन यांच्याकडे 57,507 रुपये रोख आणि 10,11,33,172 रुपये बँक खात्यात जमा आहेत. अमिताभ बच्चन यांच्याकडे 12,75,446 रुपये रोख आणि 120,45,62,083 रुपये बँक ठेव आहे. जया बच्चन यांनी केलेल्या गुंतवणुकीबद्दल बोलायचे तर त्यांनी शेअर्स, बाँड्स आणि डिबेंचरमध्ये 5,18,57,928 रुपये गुंतवले आहेत, तर अमिताभ बच्चन यांची यामध्ये 182,42,29,464 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. बच्चन दाम्पत्याने एनएसएस, पोस्टल सेव्हिंग किंवा इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एकही पैसा गुंतवला नाही.

40 कोटींहून अधिक किमतीचे दागिनेजया बच्चन यांच्याकडे 9 लाख रुपयांची वाहने आहेत, तर अमिताभ यांच्या कारचे कलेक्शन सुमारे 17 कोटी रुपये आहे. ज्वेलरीबद्दल बोलायचे झाले तर जया बच्चन यांच्याकडे 40 कोटी रुपयांचे दागिने आहेत, तर अमिताभ यांच्या नावावर 54 कोटींचे दागिने आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार, एकूण संपत्तीपैकी या जोडप्याकडे 849.11 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर 729.77 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

टॅग्स :Jaya Bachchanजया बच्चनRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAmitabh Bachchanअमिताभ बच्चनbollywoodबॉलिवूड