शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

'महाकुंभातील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकले', खा. जया बच्चन यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 16:49 IST

Jaya Bachchan on Mahakumbh 2025 :संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाकुंभातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरुन राजकारण तापले आहे.

Jaya Bachchan on Mahakumbh 2025 : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभातील चेंगराचेंगरीबाबत विरोधक सातत्याने टीका करत आहेत. आता समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी या दुर्घटनेबाबत यूपी सरकारवर मोठा आरोप केला आहे. अपघातानंतर भाविकांचे मृतदेह गंगा नदीत फेकल्याचा दावा जया बच्चन यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

संसद भवन संकुलात मीडियाशी बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, 'महाकुंभ चेंगराचेंगरीची घटना सध्या देशातील सर्वात मोठी घटना आहे. त्यांनी मृतांची नेमकी संख्या उघड करून जनतेला स्पष्टीकरण द्यावे. ते खोटे बोलत आहेत. व्यवस्था सामान्य माणसांसाठी नसून व्हीआयपींसाठी होती. महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकण्यात आले आणि त्यामुळे पाणी प्रदूषित झाले. हेच पाणी लोकांपर्यंत पोहोचत आहे. सध्या सर्वात जास्त दूषित पाणी फक्त कुंभात आहे, त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही,' अशी टीका जया बच्चन यांनी केली.

चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यूमौनी अमावस्या (28 जानेवारी) रोजी प्रयागराज महाकुंभमध्ये संगमाजवळ चेंगराचेंगरी झाली होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत 30 जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातानंतरच विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. उत्तर प्रदेशचे भाजप सरकार मृतांची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

महाकुंभाच्या मुद्द्यावरुन खरगे आणि धनखड यांच्यात वादराज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात पुन्हा एकदा संसदेत जोरदार वादावादी झाली. सोमवारी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात सभागृहातील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे महाकुंभ चेंगराचेंगरीबाबत आपले म्हणणे मांडत असताना अपघातातील मृत्यूंबाबत दोघांमध्ये वाद सुरू झाला. राज्यसभेत आपल्या भाषणात मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, महाकुंभ दुर्घटनेत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे चुकीचे असेल, तर कृपया मला सांगा...हा माझा अंदाज आहे. 

यावर जगदीप धनखड यांनी खर्गे यांना अडवत म्हणाले, तुम्ही काय बोलताय, याचा विचार केलाय का...1000 चा आकडा सांगत आहात. यातून जगाला काय संदेश जाईल? यावर खरगे म्हणाले, अखेर किती जण मेले…यात सत्य काय आहे? निदान ही माहिती तरी द्या. माझे चुकत असेल, तर मी माफी मागतो...दरम्यान, महाकुंभातील कथित गैरव्यवस्थापनाच्या मुद्द्यावर तातडीने चर्चा करण्याची मागणी करत राज्यसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. मागणी फेटाळल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रथम शून्य प्रहरात आणि नंतर प्रश्नोत्तराच्या तासावर सभागृहावर बहिष्कार टाकला.

टॅग्स :Jaya Bachchanजया बच्चनKumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेश