Jawed Habib:हेअरकट करताना जावेद हबीब केसात थुंकला, महिलेचा आरोप; व्हिडिओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 14:15 IST2022-01-06T14:15:07+5:302022-01-06T14:15:48+5:30
Jawed Habib Viral Video: प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तो महिलेच्या केसात थुंकताना दिसत आहे.

Jawed Habib:हेअरकट करताना जावेद हबीब केसात थुंकला, महिलेचा आरोप; व्हिडिओ व्हायरल
प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो एका महिलेचे केस कापताना दिसत आहे. पण, हा व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे जावेद हबीबचे केस कापताना केलेले विचित्र कृत्य. जावेद हबीबने केसात थुंकल्याचा आरोप महिलेने केला आहे.
व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की जावेद हबीब केस कापताना पाण्याऐवजी केसात थुंकला. रिशी बग्री नावाच्या ट्विटर युझरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जावेद हबीबवर जोरदार टीका होत आहे. तर, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेची प्रतिक्रियाही समोर आली आहे. मात्र, जावेद हबीबने अद्याप त्याची बाजू मांडली नाही.
For those who goes to Javed Habib's saloon pic.twitter.com/dblHxHUBkw
— Rishi Bagree (@rishibagree) January 5, 2022
नेमके काय झाले ?
जावेद हबीबचा हा व्हिडिओ मुजफ्फरनगरचा आहे. व्हिडिओमध्ये जावेद हबीब एका महिलेला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलावतो. केस कापताना तो महिलेच्या केसात थुंकतो. यादरम्यान तेथे उपस्थित असलेले लोक जोरदार टाळ्या वाजवतात. ज्या महिलेचे केस कापले जात आहेत ती व्हिडिओमध्ये थोडी अस्वस्थ दिसत आहे.
महिलेची प्रतिक्रिया
ट्विटरवर समोर आलेल्या महिलेच्या व्हिडिओमध्ये ती म्हणते, 'माझे नाव पूजा गुप्ता आहे. माझे बरौत शहरात वंशिका ब्युटी पार्लर नावाचे पार्लर आहे. काल मी जावेद हबीब सरांच्या सेमिनारला गेले होते. तिथे त्याने मला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलावले. यावेळी त्याने माझ्यासोबत गैरवर्तन केले. पाणी नसेल तर थुंकूनही केस कापता येतात, असे दाखवून दिले. मी तो हेअरकट केला नाही, यापूढे मी रस्त्यावरच्या न्हाव्याकडून केस कापून घेईन पण, जाबेदकडून नाही.