'देशाला हिंदू पाकिस्तान बनविण्याचा प्रयत्न', जावेद अख्तर यांची मोदी सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 11:28 IST2020-01-03T11:28:32+5:302020-01-03T11:28:40+5:30
तुम्ही एका भारतीय व्यक्तीला त्याचे राष्ट्रीयत्व कसंकाय मागू शकता. आदिवासी, दलित आणि गरीबांकडे पुरावा मिळाला नाही तर त्यांना सरकार कुठं पाठवणार. या लोकांनी सरकारला मतदान केले आहे. त्यावेळी त्यांना नागरिकत्व विचारले नाही, असं सांगताना अख्तर यांनी देशातील 10-12 कोटी निर्वासितांसाठी सरकारने व्यवस्था केली का, असा सवाल पस्थित केला.

'देशाला हिंदू पाकिस्तान बनविण्याचा प्रयत्न', जावेद अख्तर यांची मोदी सरकारवर टीका
नवी दिल्ली - गीतकार जावेद अख्तर आपल्या स्पष्टोक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. काही दिवसांपूर्वीच अख्तर यांनी नागरिकत्व कायद्यावरून विद्यमान सरकारवर टीकास्त्र सोडले होते. आता अख्तर यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाना साधला असून देशाला हिंदू पाकिस्तान करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रसिद्ध रंगकर्मी सफदर हाश्मी यांच्या 31व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अख्तर बोलत होते. देशातील नागरिकांना धर्माच्या आधारावर विभागले जात आहे. गर्वाने सांगा आम्ही हिंदू, अशा घोषणा देण्यास भाग पाडले जात आहे. मात्र यामुळे समस्यांचे सुटणार नाहीत. शरणार्थींना धर्म नसतो. त्यामुळे देशात असा कायदा असावा ज्यामध्ये धर्मिक भेद होऊ नये.
तुम्ही एका भारतीय व्यक्तीला त्याचे राष्ट्रीयत्व कसंकाय मागू शकता. आदिवासी, दलित आणि गरीबांकडे पुरावा मिळाला नाही तर त्यांना सरकार कुठं पाठवणार. या लोकांनी सरकारला मतदान केले आहे. त्यावेळी त्यांना नागरिकत्व विचारले नाही, असं सांगताना अख्तर यांनी देशातील 10-12 कोटी निर्वासितांसाठी सरकारने व्यवस्था केली का, असा सवाल पस्थित केला.
याआधी नागरिकता कायद्याच्या विरोधात केलेल्या आंदोलनानंतर ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी अख्तर यांनी या अटकेचा विरोध केला होता. विरोध दडपण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.