Javed Akhtar: "मग न्याय अन् माणुसकी विसरून जा", तालिबान्यांना पाठिंबा देणाऱ्यांना जावेद अख्तरांनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 10:25 AM2021-09-11T10:25:45+5:302021-09-11T10:26:48+5:30

javed akhtar: बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी तालिबानला समर्थन देण्यास तयारी दाखवलेल्या कथित सभ्य आणि लोकशाही देशांना खडेबोल सुनावले आहेत.

javed akhtar calls out countries willing to shake hands with taliban | Javed Akhtar: "मग न्याय अन् माणुसकी विसरून जा", तालिबान्यांना पाठिंबा देणाऱ्यांना जावेद अख्तरांनी सुनावलं

Javed Akhtar: "मग न्याय अन् माणुसकी विसरून जा", तालिबान्यांना पाठिंबा देणाऱ्यांना जावेद अख्तरांनी सुनावलं

googlenewsNext

javed akhtar: बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी तालिबानला समर्थन देण्यास तयारी दाखवलेल्या कथित सभ्य आणि लोकशाही देशांना खडेबोल सुनावले आहेत. जगातील प्रत्येक लोकशाही प्रधान देशानं तालिबानला मान्यता देण्यास स्पष्ट नकार द्यायला हवा. तसंच अफगाणिस्तानातील महिलांवर अन्यायासाठी तालिबानचा कठोर निषेध करायला हवा, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. 

जावेद अख्तर नेहमीच सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत असतात. त्यांच्या विधानांमुळे अनेकदा वादही निर्माण होतात. अख्तरांनी याआधी देखील तालिबानचा कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. आता पुन्हा एकदा जावेद अख्तर यांनी ट्विट करत तालिबानी सत्तेला पाठिंबा देणाऱ्या देशांवर निशाणा साधला आहे. "प्रत्येक सभ्य व्यक्ती, लोकशाही प्रधान सरकार, जगातील प्रत्येक समाजानं तालिबान्यांना मान्यता देण्यास नकार द्यायला हवा. अफगाणिस्तानातील महिलांवरील अन्यायाबाबत सर्वच देशांनी निंदा केली पाहिजे अन्यथा न्याय, माणुसकी आणि विवेक असे शब्द विसरावे", असं रोखठोक मत अख्तरांनी व्यक्त केलं आहे. 

तालिबानच्या प्रवक्त्यावरही साधला होता निशाणा
तालिबानी प्रवक्ता सय्यद झकीरुल्लाह यानं महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचाही जावेद अख्तर यांनी समाचार घेतला होता. "तालिबानी प्रवक्त्यानं जगाला सांगितलं की महिला मंत्री बननण्याचा लायकीच्या नाहीत. त्या फक्त मुलांना जन्म घालण्यासाठी आहेत. असं विधान करणाऱ्यांच्या सरकारला मान्यता देण्याची तयारी कथित लोकशाही प्रधान देशांनी केली आहे ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे", असं ट्विट जावेद अख्तर यांनी केलं होतं. 

Web Title: javed akhtar calls out countries willing to shake hands with taliban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.