Janata Curfew Live: Janta curfew commences amid rising Covid-19 cases Across the country vrd | Janata Curfew Live: अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना देशवासीयांची दाद; पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Janata Curfew Live: अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना देशवासीयांची दाद; पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातल्या 130 कोटी नागरिकांना जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत. बहुतांश ठिकाणी लोकांनी स्वत:हूनच घराबाहेर पडण्याचे टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतही जनतेची संचारबंदी करण्यात आली आहे. या काळात मुंबई व काही शहरांतील उपनगरी सेवा वगळता, एकही रेल्वेगाडी धावणार नाही. 

LIVE

Get Latest Updates

06:11 PM

अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिले धन्यवाद 

05:17 PM

ग्रँटरोडमधील जनतेकडून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अभिवादन

05:09 PM

कोरोनाचा सामना करणाऱ्या, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून टाळ्या वाजवून आभार

05:06 PM

अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे देशवासीयांनी मानले आभार; टाळ्या वाजवून, घंटानाद करुन आभार व्यक्त

04:46 PM

कधी थांबायचं हे मुंबईकरांना कळतं; पोलीस आयुक्तांकडून मुंबईकरांचं कौतुक

03:13 PM

आंध्र प्रदेशमधील विशाखापटणनच्या आरे. के. समुद्रकिनारा आज सुनासुना दिसून आला.

02:54 PM

लखनऊमध्ये नागरिकांनी दिला जनता कर्फ्यूला पाठिंबा

01:55 PM

मुंबईची लाइफ लाइन समजली जाणारी लोकसेवा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील लोकल सेवा बंद, आज रात्री 12 वाजल्यापासून 31 मार्च रात्री 12 पर्यंत लोकल ट्रेन बंद राहणार

 

01:53 PM

दिल्लीतील सर्वत्र शांतता; रस्त्यांवर नागिराकांनी नाही तर कबुतरांनी केली गर्दी

01:05 PM

दिल्लीतील सर्वत्र शांतता; रस्त्यांवर नागिराकांनी नाही तर कबुतरांनी केली गर्दी

12:54 PM

मुंबईतलं गजबजलेलं ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या लालबाग परिसरात शांतता

12:49 PM

ताडदेवकरांचा जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद; सर्व परिसरात शुकशुकाट

11:55 AM

मुंबईतील जुहू चौपाटीवरही शुकशुकाट

11:09 AM

केरळमधील त्रिवेंद्रमच्या समुद्रकिनाऱ्यांवर शुकशुकाट

10:48 AM

उत्तराखंडातही जनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

10:26 AM

त्रिपुरातही सर्व रस्त्यांवर शुकशकाट

10:06 AM

मणिपूरमधील इंफाळमध्ये शहरातदेखील शुकशुकाट

09:59 AM

जम्मू- काश्मीरात देखील जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद; नागरिकांनी घरातच राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

09:52 AM

मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

09:41 AM

बंगळुरुत देखील मॅजेस्टिक बस स्थानक थंड; जनत कर्फ्यूला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

09:21 AM

मडगावातील रस्त्यावर शुकशुकाट; पर्यटक नसल्याने कोलवा किनाराही ओस

09:18 AM

नेहमीच वर्दळ असणारं दादर रेल्वे स्टेशन आज शांत असल्याचे दिसून येत आहे.

09:11 AM

सोलापुरातील रस्त्यांवर फक्त पोलीसच; घराबाहेर न पडण्याचे पोलिसांकडून आवाहन

08:43 AM

रत्नागिरीतल्या कायम वर्दळ दिसणाऱ्या रस्त्यांवरही शुकशुकाट पसरला आहे...

08:42 AM

अहमदनगरमधल्या ग्रामीण भागात पूर्ण शुकशुकाट पसरला असून, रस्त्यांवर माणसांची वर्दळ दिसेनाशी झाली आहे. 

08:34 AM

मोदींच्या जनता कर्फ्युला जळगावकरांचा पाठिंबा, सर्व रस्ते झाले निर्मनुष्य

08:29 AM

हैदराबादमधल्या हिमायतनगरमध्ये जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद 

08:27 AM

देशभरात जनता कर्फ्यूला सुरुवात, मेरठमध्ये रस्ते पडले ओस 

08:26 AM

एरव्ही कांदा विक्रीसाठी नाशकातली लासलगाव ही सकाळी गजबजणारी बाजारपेठ आणि सर्वच मुख्य रस्त्यासह लहान रस्त्यावर देखील नजरेला एकही मनुष्य दिसत नसल्याने लासलगावी जनता कर्फ्यु सुरू झाला आहे.

08:23 AM

एरवी माॅर्निंग वाॅक आणि व्यायामसाठी शिवाजी पार्क, पाच उद्यान, वरळी सी-फेस आदी भागात गर्दी करणाऱ्या नागरिकांनी आज एकप्रकारे सुट्टीच घेतली.

08:22 AM

सोलापूर : सकाळी सहा वाजल्यापासूनच सोलापुरात जनता कर्फ्यूला सुरुवात;  व्यायाम, मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांनी घराबाहेर येणे टाळलं

Web Title: Janata Curfew Live: Janta curfew commences amid rising Covid-19 cases Across the country vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.