Corona Virus News: एक गाव असं की जिथं जवळपास सर्व गावकरी कोरोना पॉझिटिव्ह! प्रशासनाला खडबडून जाग, सर्वांची धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 17:11 IST2022-01-13T17:10:22+5:302022-01-13T17:11:00+5:30
Corona Virus News: झारखंडच्या पूर्व सिंहभूमच्या शहरी परिसरानंतर आता ग्रामीण परिसरातही कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळतो आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.

Corona Virus News: एक गाव असं की जिथं जवळपास सर्व गावकरी कोरोना पॉझिटिव्ह! प्रशासनाला खडबडून जाग, सर्वांची धावपळ
Corona Virus News: झारखंडच्या पूर्व सिंहभूमच्या शहरी परिसरानंतर आता ग्रामीण परिसरातही कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळतो आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भाग कोरोनामुक्त झाला होता. पण आता पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ग्रामीण भागात घाटशिला, मुसाबनी आणि चाकुलिया विभागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.
मंगळवारी जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक ११६० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन देखील सतर्क झालं आहे. कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी शहरी भागात कोरोना चाचणीसाठी एकूण सहा सेंटर सुरु करण्यात आले आहेत. यात साकची जेल चौक येथील कोविड कलेक्शन सेंटर, सोनारी सेवा सदर, एमई स्कूल जुगसलाई, सिदगोडा टाऊन हॉल, शहरी उप-स्वास्थ्य केंद्र मानगो आणि बिरसानगर झोन नंबर-१ बी येथील रायकीय प्रायमरी स्कूल यांचा समावेश आहे. या सेंटरवर सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत कोरोना चाचणीसाठीचं सॅम्पल घेण्यात येत आहे.
लक्षणं दिसल्यास करा चाचणी
पूर्व सिंहभूम जिल्ह्याचे डीसी सूरज कुमार यांनी ट्विट करत सर्व चाचणी केंद्रांची माहिती दिली आहे. तसंच सर्दी, खोकला, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणं दिसून येत असतील तातडीनं नजिकच्या चाचणी केंद्रात जाऊन कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन देखील केलं आहे. तसंच मास्क व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
कोणकोणत्या विभागात किती रुग्ण?
बहरागोडा- १३
चाकुलिया- ६२
धालभूमगड- ७
डुमरिया- १
घाटशिला- १४७
शहरी क्षेत्र- ४३९९
मुसाबनी- ४४
पटमदा- ७
पोटका- १६