‘बेबी तू आया नहीं मुझे लेने..., तू...’, फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांच्या पार्थिवासमोर होणाऱ्या पत्नीचा टाहो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 18:11 IST2025-04-04T18:10:34+5:302025-04-04T18:11:25+5:30
जामनगर हवाई दलाच्या तळाजवळ बुधवारी रात्री झालेल्या विमान अपघातात सिद्धार्थ यादव यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ यादवचे नुकतेच लग्न झाले होते आणि या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याचे लग्न होणार होते.

‘बेबी तू आया नहीं मुझे लेने..., तू...’, फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांच्या पार्थिवासमोर होणाऱ्या पत्नीचा टाहो!
गुजरातमध्ये झालेल्या जग्वार लढाऊ विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांच्यावर शुक्रवारी हरियाणातील रेवाडी जिल्ह्यातील माजरा भालखी या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील सुशील यादव यांनी त्यांच्या त्यांना मुखाग्नी दिला. सिद्धार्थ २८ वर्षांचे होते. यावेळी त्यांची होणारी पत्नी सानिया देखील पोहोचली होती. ती वारंवार म्हणत होती, 'बेबी तू आया नहीं मुझे लेने… तू बोल कर गया था कि मैं तुझे लेने आऊंगा...'
जामनगर हवाई दलाच्या तळाजवळ बुधवारी रात्री झालेल्या विमान अपघातात सिद्धार्थ यादव यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ यादवचे नुकतेच लग्न झाले होते आणि या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याचे लग्न होणार होते. सिद्धार्थ हे माजी सैनिकांच्या कुटुंबातील होते, त्याचे वडील सुशील यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली होती आणि त्याचे आजोबा आणि पणजोबा देखील सैन्यात होते.
फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांचे पार्थिव रेवाडी येथे आणण्यात आले होते. तेथून ते त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हातात तिरंगा घेऊन अनेक माजी सैनिकांसह मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उभे होते. त्यांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या वाहनावर त्यांनी फुलांचा वर्षाव केला.
सिद्धार्थ यांच्या सन्मानार्थ भारतीय हवाई दलाच्या जवानांनी बंदुकीची सलामी दिली. हरियाणाचे माजी मंत्री बनवारी लाल, रेवाडी जिल्ह्यातील बावल येथील भाजप आमदार कृष्ण कुमार, हजारो स्थानिक लोक, भारतीय हवाई दलाचे (IAF) अधिकारी, सशस्त्र दलाचे सदस्य, पोलिस अधिकारी आयएएफ अधिकाऱ्याला अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते.
"बेबी तू आया नहीं मुझे लेने। तूने कहा था..." -
सिद्धार्थ यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी त्यांची होणारी पत्नी सानिया देखील आली होती. ती मृतदेहाकडे पाहून रडत राहिली. सिद्धार्थचा फोटो पाहून सानिया वारंवार म्हणत होती, "बेबी तू आया नहीं मुझे लेने, तूने कहा था तू आएगा..." तसेच, आपल्याला सिद्धार्थचा अभिमान आहे, हेरी सानियाने म्हणाली. सिद्धार्थचे लग्न २ नोव्हेंबर रोजी होणार होते.