जम्मू काश्मीर : कुपवाडा येथील चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 15:41 IST2018-08-02T15:40:46+5:302018-08-02T15:41:28+5:30

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला आज मोठे यश मिळाले असून, कुपवाडा येथील लोलाब येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. 

Jammu Kashmir: Two militants killed by army in Kupwara | जम्मू काश्मीर : कुपवाडा येथील चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीर : कुपवाडा येथील चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला आज मोठे यश मिळाले असून, कुपवाडा येथील लोलाब येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. 
जम्मू काश्मीर पोलीस दलाचे डीजीपी एसपी वैद यांनी ट्विट करून या चकमकीबाबत माहिती दिली आहे. "काही मिनिटांपूर्वीच कुपवाडामधील लोलाब परिसरात लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे, " असे ट्विट एसपी वैद यांनी केले आहे. 



 

 

Web Title: Jammu Kashmir: Two militants killed by army in Kupwara