दहशतवाद थोपवण्याचा नवा प्लान, राजौरी सेक्टरमध्ये नागरिकांना बंदुक चालवण्याचं ट्रेनिंग अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 18:39 IST2023-01-09T18:34:43+5:302023-01-09T18:39:35+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी सीआरपीएफकडून ग्राम विकास समिती अंतर्गत गावकऱ्यांना बंदुक चालवण्याचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे.

दहशतवाद थोपवण्याचा नवा प्लान, राजौरी सेक्टरमध्ये नागरिकांना बंदुक चालवण्याचं ट्रेनिंग अन्...
राजौरी-
जम्मू-काश्मीरमध्येदहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी सीआरपीएफकडून ग्राम विकास समिती अंतर्गत गावकऱ्यांना बंदुक चालवण्याचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. गेल्या काही दिवसात पुँछ आणि राजौरीमध्ये झालेल्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
राजौरी जिल्ह्यातील धनगरीमध्ये प्रत्येक ग्रामरक्षा समितीतील एखा सदस्याला SLR रायफल देण्यात येणार आहे. तर काही ग्राम रक्षा समित्यांमध्ये दोन ते तीन सदस्यांना स्वयंचलित रायफल्स देण्यात येणार आहेत.
राजौरी जिल्ह्यातील धनगरी गावात सोमवारी एक विशेष शिबीर राबवण्यात आलं आणि यात जवळपास १०० सदस्यांना शस्त्र देण्यात आली. यात ४० माजी सैनिकांचा समावेश आहे ज्यांना एसएलआर रायफल देण्यात आली आहे. पोलिसांच्या मार्फत राबवण्यात आलेल्या शिबीरात ६० स्थानिक लोकांना देखील बंदुक देण्यात आली. आतापर्यंत एकूण ३०३ शस्त्रांचं वाटप करण्यात आलं आहे. ४० माजी सैनिकांना सेल्फ-लोडिंग रायफल देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन दहशतवाद्यांना तात्काळ उत्तर देता येईल. याशिवाय गावातील माजी सैनिकांनी इतर नागरिकांना संरक्षणाचं प्रशिक्षण देखील दिलं आहे. ग्राम रक्षा समित्यांनी बंदूक उपलब्ध करुन दिल्यामुळे सरकारचे आभार मानले आहेत.
जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि श्रीनगर येथील जदीबल परिसरात नव्या वर्षाच्या दिवशी दहशतवाद्यांनी हिंदू कुटुंबीयांना लक्ष्य केलं होतं. यात आतापर्यंत ७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हिंदू कुटुंबीयांना जाणीवपू्र्वक लक्ष्य केलं जात असल्याचं दिसून येत आहे. या सेक्टरमध्ये गुप्तचर विभाग देखील अलर्ट मोडवर आहे. केंद्र सरकारनं पुँछ आणि राजौरीमध्ये सीआरपीएफच्या जवळपास १८ तुकड्या तैनात केल्या आहेत. राजौरी पोलिसांनी VDS सदस्य आणि माजी सैनिकांना त्यांच्या बंदुकांसोबत बोलवलं होतं. जेणेकरुन स्थानिक पोलिसांकडून त्यांच्याजवळील बंदुका तपसता येतील. आवश्यकतेनुसार पोलिसांकडून नव्या बंदुका देखील जारी करण्यात येतील.