शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

J&K : श्रीनगरच्या लाल चौकात दहशतवादी हल्ला; 15 लोक जखमी, संपूर्ण परिसर सील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 15:42 IST

Jammu Kashmir Terror Attack : लाल चौकात दहशतवाद्यांनी ग्रेनेड स्फोट घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे.

Jammu Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. श्रीनगरमधील अत्यंत गजबजलेल्या लाल चौकात दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा स्फोट घडवून आणला. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात किमान 15 जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर लाल चौकात घबराट पसरली असून, परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाने घेराबंदी केली आहे. 

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांनी लाल चौकातील ऑल इंडिया रेडिओ स्टेशनबाहेर सीआरपीएफच्या बंकरवर हा ग्रेनेड हल्ला केला आहे. माहिती मिळताच, जम्मू-काश्मीर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले असून, या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, स्फोटात जखमी झालेल्या सर्व लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलाने स्फोट झालेला संपूर्ण परिसर सील केला आहे.

दहशतवाद्यांसोबत चकमकदरम्यान, श्रीनगरच्या खन्यारमध्ये काल म्हणजेच शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर कमांडर उस्मानला ठार केले होते. उस्मान हा लष्कर कमांडर सज्जाद गुलचा उजवा हात मानला जातो. उस्मानचे सांकेतिक नाव ‘छोटा वलीद’ असे होते.

तो काश्मीरमधील लष्कर-ए-तैयबाचा सर्वात वरिष्ठ कमांडर मानला जात होता. उस्मानच्या मृतदेहासोबतच मोठ्या प्रमाणात दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. काश्मीरमध्ये गेल्या 48 तासांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी चकमकी झाल्या. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकींमध्ये श्रीनगर, बांदीपोरा आणि अनंतनागचा समावेश आहे.

हल्ला अस्वस्थ करणारा-मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेचा निषेध केला असून, हा हल्ला अत्यंत संतापजनक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “गेल्या काही दिवसांपासून खोऱ्यातील काही भागात हल्ले आणि चकमकीच्या बातम्या येत आहेत. श्रीनगरच्या रविवारच्या बाजारात निष्पाप दुकानदारांवर ग्रेनेड हल्ला झाल्याची आजची बातमी अतिशय अस्वस्थ करणारी आहे. निरपराध नागरिकांना लक्ष्य करण्याचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही. सुरक्षा यंत्रणांनी हल्ल्याची ही लाट लवकरात लवकर थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत."

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सातत्याने कारवाया सुरू आहेत. दहशतवादी दररोज येथे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात आणि नेहमीच दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचत असतात. याला तोंड देण्यासाठी सुरक्षा दल सदैव तत्पर असतात.

सुरक्षा दलाचे 4 जवानही जखमी झाले आहेतअधिकाऱ्याने सांगितले की, उस्मान एक दशकापासून खोऱ्यात सक्रिय होता आणि अनेक हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्याची हत्या हा जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांसाठी मोठा धक्का आहे. उस्मान हा येथील पाकिस्तानी लष्कराचा सर्वात वरिष्ठ कमांडर असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीनगर चकमकीत सुरक्षा दलाचे चार जवानही जखमी झाले आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी