Jammu Kashmir News & Live Update: ऐतिहासिक निर्णयानंतर संसद विद्युत रोषणाईत रंगली

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 10:16 AM2019-08-05T10:16:27+5:302019-08-05T22:46:04+5:30

श्रीनगर - कलम 35- ए आणि 370 वरून गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील वातावरण तापत चाललं आहे. अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर ...

Jammu Kashmir news and Live updates, Narendra Modi Amit Shah Decides to Revoke Article 370 Article 35A in Rajya Sabha | Jammu Kashmir News & Live Update: ऐतिहासिक निर्णयानंतर संसद विद्युत रोषणाईत रंगली

Jammu Kashmir News & Live Update: ऐतिहासिक निर्णयानंतर संसद विद्युत रोषणाईत रंगली

Next

श्रीनगर - कलम 35- ए आणि 370 वरून गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील वातावरण तापत चाललं आहे. अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता काश्मीरमध्ये वेगानं घडामोडी घडत आहेत. काश्मीरमधील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याची शिफारस केली. या शिफारशीला राष्ट्रपतींनीही मान्यता दिली आहे. देशाच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. 

LIVE

Get Latest Updates

10:40 PM

ऐतिहासिक निर्णयानंतर संसद विद्युत रोषणाईत डुबली



 

10:33 PM

केंद्रीय मंत्र्यांनी वक्त केला आनंद



 

10:01 PM

काँग्रेसने खासदारांना बजावला व्हीप



 

08:41 PM

काश्मीरमध्ये केवळ मुस्लिम राहतात का? अमित शहा यांनी दिले विरोधकांना प्रत्युत्तर

काश्मीरमध्ये केवळ मुस्लिम राहतात का? अमित शहा यांनी दिले विरोधकांना प्रत्युत्तर

 

08:40 PM

इतिहास चुकीचे ठरवेल; 370 वरून मोदींना पी चिदंबरम यांचा इशारा

Jammu & Kashmir: इतिहास चुकीचे ठरवेल; 370 वरून मोदींना पी चिदंबरम यांचा इशारा

08:14 PM

मोदी सरकारला इतिहास चुकीचे ठरवेल : चिदंबरम

मोदी सरकार मोठ्या संख्येने विजयी झाले आहे. पण तुम्ही चुकीचे आहात. इतिहास तुम्हाला चुकीचे ठरवेल. आज केलेली चूक पुढील पिढीच्या लक्षात येईल. : चिदंबरम



 

06:50 PM

विरोधकांनी मत विभागणी मागितल्याने चिठ्ठीद्वारे मतदान प्रक्रिया सुरु



 

06:42 PM

जम्मू काश्मीरमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षण लागू होणार; राज्यसभेत मंजूर



 

04:49 PM

देश 70 वर्षांपासून वाट पाहत होता; भाजपाच्या अजेंड्यावरही कलम 370 होते : सितारामन



 

04:21 PM

कलम 370 रद्द प्रस्तावावर राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस मतदान टाळणार



 

03:38 PM

कलम 370 रद्द करण्यास तेलगू देसम पक्षाचा पाठिंबा



 

03:24 PM

एनएसए अजित डोवाल काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार



 

02:26 PM

काश्मीरमधील लोकांच्या हिताचा निर्णय - आरएसएस

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आरएसएसकडून स्वागत करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरमधील लोकांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय आहे. कोणतंही राजकारण न करता या निर्णयाचं सर्वांनी स्वागत करायलं हवं अशी प्रतिक्रिया आरएसएसने दिली आहे. 

02:22 PM

गृह मंत्रालयाकडून काश्मीरमधील लोकांना सुरक्षा पुरविण्याचे आदेश

जम्मू काश्मीरच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी. तसेच डीजीपी आणि सर्व सुरक्षा यंत्रणांना खबरदारी घेण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. 

02:19 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही साजरा केला आनंद

02:04 PM

शिवसैनिकांनी मिठाई वाटून केलं सरकारच्या निर्णयाचं स्वागत

02:02 PM

काश्मीरमधील नेत्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं - शरद पवार

कलम 370 हटविण्याचा निर्णय सरकारने काश्मीर खोऱ्यातील नेत्यांना विश्वासात घेऊन करणं गरजेचे होतं. पण सरकारकडून असं काही न करता त्यांनी कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. 

01:02 PM

भारतीय लष्कर आणि हवाई दल हायअलर्टवर

01:00 PM

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा मोदी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा - शिवसेना

कलम 370 हटवला तर ते हात जळून खाक होतील अशी भाषा फुटिरतावादी नेत्यांकडून केली जात आहे. तुम्ही जाळून दाखवाच. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंमत दाखवली, आजचा दिवस स्वातंत्र्य दिनासारखाच आहे, कलम 370 हटवण्याला विरोध करणारे तेच आहेत, ज्यांनी 70 वर्ष काश्मीर धगधगतं ठेवलं, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सभागृहात मांडलं. 

12:26 PM

कलम 370 हटविण्याचा पीडीपी खासदारांनी कपडे फाडून केला निषेध

राज्यसभेत पीडीपी खासदार नझीर अहमद आणि एम एम फैयाज यांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावाला विरोध करत कपडे फाडून निषेध केला. 

12:03 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार

कलम 370 हटविल्यानंतर राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ केला. जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडला. देशातील इतिहासातील ऐतिहासिक असा निर्णय मोदी सरकारने घेतला असून या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. थोड्याच वेळात या मुद्द्यावरुन संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करतील. 

Image result for narendra modi

11:51 AM

जम्मू काश्मीरचं विभाजन, 'लडाख' नवं केंद्रशासित राज्य

जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन होऊन लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित राज्य स्थापन करण्यात आलं आहे. तसेच जम्मू काश्मीरलाही केंद्रशासित राज्य म्हणून जाहीर केलं आहे. 

11:38 AM

कलम 370 हटविण्याच्या शिफारशीला राष्ट्रपतींनी दिली मान्यता

11:26 AM

जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव राज्यसभेत मांडला

कलम 370 हटविण्याच्या शिफारशीवरुन राज्यसभेत गदारोळ झाला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव सभागृहात मांडला. 

11:21 AM

कलम 370 मधील काही तरतुदी वगळणार - अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत काश्मीर प्रश्नावर निवेदन सादर केलं. कलम 370 मधील काही तरतुदी वगळणार असल्याचं शहा यांनी सांगितले. तसेच जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव अमित शहांकडून सभागृहात मांडण्यात आला. 

11:15 AM

काश्मीर मुद्द्यावर राज्यसभेत चर्चेला सुरुवात

संपूर्ण काश्मीर खोऱ्यात कर्फ्यू लावण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांना नजर कैद करण्यात आलं आहे. काश्मीरमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे काश्मीरचा मुद्दा चर्चेला आणावा अशी मागणी काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांनी राज्यसभेत केली. 

11:05 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत पोहचले

10:43 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत पोहचले

10:36 AM

काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम आहे तरी काय?

10:25 AM

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर अमित शहा निघाले

केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक संपली, गृहमंत्री अमित शहा बैठकीबाबत लोकसभेत आणि राज्यसभेत निवेदन सादर करणार 

10:22 AM

सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर काश्मीरात कलम 144 लागू

काश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या वेगवान घडामोडी 5 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून जम्मू काश्मीरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. अनेक भागात सीआरपीएफच्या जवानांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. 

10:19 AM

अमित शहा संसदेत केंद्र सरकारची बाजू मांडणार

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा राज्यसभेत 11 वाजता आणि लोकसभेत 12 वाजता केंद्र सरकारकडून निवेदन सादर करणार आहेत. 

Web Title: Jammu Kashmir news and Live updates, Narendra Modi Amit Shah Decides to Revoke Article 370 Article 35A in Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.