जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये भीषण IED स्फोट; 2 जवान शहीद 1 गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:39 IST2025-02-11T18:39:28+5:302025-02-11T18:39:59+5:30
Jammu & Kashmir News: या घटनेनंतर परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे.

जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये भीषण IED स्फोट; 2 जवान शहीद 1 गंभीर जखमी
Jammu & Kashmir News:जम्मू-काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील अखनूर सेक्टरमध्ये फॉरवर्ड पोस्टवर IED स्फोट झाला असून, त्यात लष्करातील एक कॅप्टन आणि एक जवान शहीद झाले आहेत. तर, आणखी एक जवान जखमी अशून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मंगळवारी(11 फेब्रुवारी) दुपारी 3.30 च्या आसपास हा स्फोट झाला. सध्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
Suspected Improvised Explosive Device blast reported in #Laleali in #Akhnoor Sector during a fence patrol resulting in two fatalities.
— White Knight Corps (@Whiteknight_IA) February 11, 2025
Own troops are dominating the area and search #operations are underway.
White Knight Corps salutes and pays tribute to the supreme sacrifice of…
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचे पथक नेहमीप्रमाणे भटाल भागात गस्त घालत होते. यादरम्यान एलओसीजवळ भीषण आयईडी स्फोट झाला. यात एका अधिकाऱ्यासह तीन जवान गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील दोघांना हौतात्म्य आले, तर तिसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोटानंतर लगेचच संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली.
अखनूर सेक्टरमध्ये मोर्टार शेल सापडला
आजच या भागात लष्कराला एक मोर्टार शेल सापडला होता, जो बॉम्ब निकामी पथकाने निकामी केला. अधिकाऱ्याने सांगितले की, स्थानिकांना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नामंदर गावाजवळील प्रताप कालव्यात हा मोर्टार शेल दिसला होता.
एलओसीजवळ सापडला शस्त्रांचा साठा
सुरक्षा दलांनी सोमवारी कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील कर्नाह भागात शोध मोहिमेदरम्यान शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त केला. अधिका-यांनी सांगितले की, परिसरात शस्त्रे आणि दारूगोळा असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने अमरोहीमध्ये शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान, सुरक्षा दलांनी एक एके 47 रायफल, एक एके मॅगझिन, एक सायगा एमके रायफल, एक सायगा एमके मॅगझिन आणि 12 राउंड जप्त केले.