Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! किश्तवाडमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरसह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 10:25 IST2025-04-12T10:24:19+5:302025-04-12T10:25:02+5:30
Jammu And Kashmir : किश्तवाड जिल्ह्यातील छात्रू भागात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. सर्च अँड डिस्ट्रॉय ऑपरेशनदरम्यान आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! किश्तवाडमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरसह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील छात्रू भागात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. सर्च अँड डिस्ट्रॉय ऑपरेशनदरम्यान आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. हे ऑपरेशन ९ एप्रिलपासून सुरू होतं. शुक्रवारी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. त्यानंतर आता सुरक्षा दलांनी आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर सैफुल्लाह होता. सध्या संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू आहे.
९ एप्रिलपासून किश्तवाडच्या छात्रू जंगलात शोध मोहीम राबवण्यात येत होती. गुरुवारीही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यानंतर, सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफ जवानांसह पॅरा कमांडो इतर दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. रामनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी पूर्वा सिंह हे देखील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांसोबत काम करत आहेत.
Op Chhatru : Update
— White Knight Corps (@Whiteknight_IA) April 12, 2025
In the ongoing operations at #Chhatru, Kishtwar, despite bad and inclement weather, two more Pakistani terrorists have been eliminated. A large quantity of war like stores including One AK and One M4 rifle have been recovered.
Operations are in progress.…
जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी, लष्कराने राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील सुरक्षा आणखी मजबूत केली आहे. हा महामार्ग केंद्रशासित प्रदेशाच्या अनेक भागांना जोडतो. दहशतवाद्यांचे शस्त्रास्त्रे आणि वस्तूंची तस्करी करण्यासाठी वापरण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी लष्कराने अनेक मोठी पावलं उचलली आहेत.
लष्कराने महामार्गावर दिवसरात्र गस्त वाढवली आहे. विशेषतः संवेदनशील क्षेत्र आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्ष ठेवलं जात आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने अनेक ठिकाणी मोबाईल वाहन चेक पोस्ट (MVCPs) उभारण्यात आले आहेत. या चेक पोस्ट तपासणी करतात, त्यामुळे दहशतवाद्यांना या मार्गाचा गैरवापर करता येणार नाही. या चेक पोस्टवर संशयास्पद वाहनं आणि लोकांची तपासणी केली जात आहे.