जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 01:01 IST2025-05-15T01:00:33+5:302025-05-15T01:01:13+5:30

Operation Sindoor: कठुआ जिल्ह्यात एका घराचे दार अचानक लष्करी गणवेशातील दोघांनी वाजवले आणि घरातील महिलेकडे पाणी मागितले. परंतु, या दोघांच्या हालचाली संशयास्पद आढळल्याचे म्हटले जात आहे.

jammu kashmir kathua district after local resident woman reports suspicious movement search operation started | जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू

जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू

Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानला जागा दाखवून दिली. त्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच होत्या. पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ला भारताने परतवून लावला. ‘ऑपरेशन सिंदूर’ यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे. आताच्या घडीला सीमेवर शांतता असली, तरी तिन्ही दल सतर्क आहेत. यातच जम्मू काश्मीरच्या कठुआ येथे सैन्य गणवेशात काही संशयित दिसल्याचे सांगितले जात आहे. याबाबतची माहिती मिळताच शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील एका गावात संशयित हालचाली दिसून आल्या. याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी घघवाल आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम हाती घेतली आहे. घघवाल आणि त्याच्या शेजारील ग्रामीण भागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही अज्ञान व्यक्तींच्या हालचालींबाबत तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

अचानक घराचे दार वाजले, पाणी मागितले अन्...

याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली. एका स्थानिक महिलेने पोलिसांना सांगितले की, लष्करी गणवेशातील दोन पुरुष तिच्या घरी आले आणि त्यांनी पाणी मागितले. पाणी प्यायल्यानंतर ते म्हणाला की, आता ते त्यांच्या 'कॅम्प'मध्ये परतत आहेत आणि ते तिथून निघून गेले. परंतु, महिलेला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे या महिलेने यासंदर्भात ताबडतोब पोलिसांना कळवले. यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, संशयितांची ओळख किंवा उपस्थिती अद्याप निश्चित होऊ शकली नाही. परंतु सदर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. घरोघरी शोध घेण्याबरोबरच जंगल आणि निर्जन भागातही तपास सुरू आहे.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया आणि घुसखोरीच्या प्रयत्नांमध्ये वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही माहिती गांभीर्याने घेतली जात आहे. सुरक्षा यंत्रणांना भीती आहे की, दहशतवादी लष्करी गणवेश परिधान करून ग्रामीण भागात लपण्याचा प्रयत्न करू शकतात. या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांना आवाहन केले जात आहे की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला घरात प्रवेश देऊ नये आणि प्रशासनाला कोणताही विलंब न करता काहीही संशयास्पद आढळल्यास त्वरीत कळवावे. पोलिस आणि सुरक्षा दल शोध मोहिमेदरम्यान श्वान पथके आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे म्हटले जात आहे.

 

Web Title: jammu kashmir kathua district after local resident woman reports suspicious movement search operation started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.