Jammu-Kashmir : सोपोरमध्ये चकमकीत जवानाला वीरमरण, तर दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 12:36 IST2018-10-26T10:17:45+5:302018-10-26T12:36:23+5:30

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला परिसरात शुक्रवारी सकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. बारामुल्लातील सोपोर परिसरात चकमक सुरू आहे.

Jammu Kashmir : jammu kashmir sopore encounter terrorist baramulla indian army | Jammu-Kashmir : सोपोरमध्ये चकमकीत जवानाला वीरमरण, तर दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu-Kashmir : सोपोरमध्ये चकमकीत जवानाला वीरमरण, तर दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला परिसरात शुक्रवारी सकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. बारामुल्लातील सोपोर परिसरात चकमक सुरू आहे. या ठिकाणी दहशतवादी लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान,  दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात अजूनही चकमक सुरू आहे.

सोपोरमधील मलगनिपोरा येथे हे दहशतवादी लपले आहेत. जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली आहे. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली आहे. चकमकीदरम्यान एक जवान शहीद  झाला आहे. 



 




 



(लष्कर-ए-तय्यबाच्या दोन अतिरेक्यांचा काश्मीरमध्ये खात्मा)

दरम्यान, काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी गुरुवारी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ते दोघे लष्कर-ए-तय्यबाचे होते, असे पोलिसांनी सांगितले. काही दहशतवादी त्या भागात लपून बसल्याची माहिती मिळताच गुरुवारी सकाळपासूनच जवानांनी त्यांचा शोध सुरू केला होता. दोघे ठार झाल्यानंतरही संध्याकाळपर्यंत चकमक सुरू होती.  

Web Title: Jammu Kashmir : jammu kashmir sopore encounter terrorist baramulla indian army