Jammu Kashmir : पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 09:00 IST2018-10-19T08:37:08+5:302018-10-19T09:00:47+5:30
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. गुरुवारी (18 ऑक्टोबर) रात्री जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

Jammu Kashmir : पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी
श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. गुरुवारी (18 ऑक्टोबर) रात्री जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 7 जवान जखमी झाले असून तीन जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये पुलवामा-लस्सीपूरा रोडवर दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणल्यानंतर जवानांच्या वाहनावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये सात जवान जखमी झाले. सुरक्षा दलाच्या जवानांनी हल्ल्यानंतर या संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. तसेच कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.