शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 22:01 IST

29 वर्षीय BJP उमेदवार शगुन परिहार यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या सज्जाद अहमद किचलूचा 521 मतांनी पराभव केला.

Jammu-Kashmir Election Result 2024 : आज जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. हरयाणामध्ये भाजपने सलग तिसऱ्यांदा एकहाती सत्ता खेचून आणली, तर जम्मू-काश्मीरमध्येही दमदार कामगिरी केली. राज्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने 49 तर भाजपने 29 जागा जिंकल्या आहेत. याशिवाय, इतर पक्ष+ अपक्षांना 12 जागा मिळाल्या. यादरम्यान, मुस्लिमबहुल मतदारसंघ असलेल्या किश्तवाडची चर्चा होत आहे.

जम्मू-काश्मीरमधील बहुतांश मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा पराभव झाला, पण किश्तवाडमध्ये भाजपने विजय मिळवला. या मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजप उमेदवार शगुन परिहार विजयी झाल्या आहेत. हा विजय भाजपसाठी खुप महत्त्वाचा आहे, कारण या मतदारसंघात मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे येथून हिंदू उमेदवाराचा विजय होणे, भाजपसाठी महत्त्वाचे आहे.

सज्जाद अहमद किचलूचा पराभव किश्तवाडमधून 29 वर्षीय भाजप उमेदवार शगुन परिहार हिने नॅशनल कॉन्फरन्सचे सज्जाद अहमद किचलू यांचा 521 मतांनी पराभव केला. किश्तवाड ही मुस्लिम बहुसंख्य जागा आहे, जिथे 70% पेक्षा जास्त लोकसंख्या मुस्लिम आहे. शगुनला 29053 मते मिळाली, तर किचलू यांना 28532 मते मिळाली. शगुनने आपल्या विजयाबद्दल तेथील जनतेचे आभार मानले आणि हा विजय केवळ तिचाच नाही, तर जम्मू-काश्मीरच्या जनतेचा विजय असल्याचे म्हटले. 

वडील आणि काकाची हत्याशगुन परिहारचे वडील अजित परिहार आणि काका अनिल परिहार हे भाजपचे राज्यातील दिग्गत नेते होते. 2018 मध्ये या दोघांचीही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. पीएम मोदींनी डोडा येथील रॅलीमध्येही याचा उल्लेख केला होता. शगुन परिहारच्या वडील आणि काकांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. आम्ही तिला उमेदवारी दिली, हे दहशतवाद संपवण्याच्या भाजपच्या संकल्पाचे जिवंत उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया पीएम मोदींनी दिली होती.

टॅग्स :jammu and kashmir assembly election 2024जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस