शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

Jammu-Kashmir: ढगफुटी होऊन 4 जणांचा मृत्यू तर 30 ते 40 बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 11:16 AM

Jammu-Kashmir Cloudburst: खराब वातावरणामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत.

ठळक मुद्देदेशातील अनेक प्रमुख राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडच्या होंजर डच्चन गावात ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे. वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 4 जणांचा मृत्यू झालाय तर 30 ते 40 जण बेपत्ता आहेत. खराब हवामानामुळे रेस्क्यु टीमला घटनास्थळावर जाण्यास अडचणी येत आहेत. जखमींना एअरलिफ्ट करण्यासाठी एअरफोर्सची मदत घेतली जात आहे.

किश्तवाडच्या उपायुक्तांनी सांगितल्यानुसार, खराब वातावरणामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत, पण बचाव कार्यात वेग आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. SDRF च्या पथकांनी मोर्चा हाती घेतला आहे. दरम्यान ढगफुटीमुळे किश्तवाडमधील 9 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या चार जणांचे मृतदेह बाहेर काढले असून, इतर बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. 

अनेक राज्यात मुसळधारसध्या देशातील अनेक प्रमुख राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मानसूनचे तिसरे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या खाडीत विकसित होत आहे. यामुळे शनिवारपर्यंत उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, देशात 27 जुलैपर्यंत 408.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरfloodपूरRainपाऊस