Jammu-Kashmir: ढगफुटी होऊन 4 जणांचा मृत्यू तर 30 ते 40 बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 11:16 AM2021-07-28T11:16:57+5:302021-07-28T11:17:07+5:30

Jammu-Kashmir Cloudburst: खराब वातावरणामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत.

Jammu-Kashmir: 4 killed, 30 to 40 missing in cloudburst in kishwad area | Jammu-Kashmir: ढगफुटी होऊन 4 जणांचा मृत्यू तर 30 ते 40 बेपत्ता

Jammu-Kashmir: ढगफुटी होऊन 4 जणांचा मृत्यू तर 30 ते 40 बेपत्ता

Next
ठळक मुद्देदेशातील अनेक प्रमुख राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडच्या होंजर डच्चन गावात ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे. वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 4 जणांचा मृत्यू झालाय तर 30 ते 40 जण बेपत्ता आहेत. खराब हवामानामुळे रेस्क्यु टीमला घटनास्थळावर जाण्यास अडचणी येत आहेत. जखमींना एअरलिफ्ट करण्यासाठी एअरफोर्सची मदत घेतली जात आहे.

किश्तवाडच्या उपायुक्तांनी सांगितल्यानुसार, खराब वातावरणामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत, पण बचाव कार्यात वेग आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. SDRF च्या पथकांनी मोर्चा हाती घेतला आहे. दरम्यान ढगफुटीमुळे किश्तवाडमधील 9 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या चार जणांचे मृतदेह बाहेर काढले असून, इतर बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. 

अनेक राज्यात मुसळधार
सध्या देशातील अनेक प्रमुख राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मानसूनचे तिसरे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या खाडीत विकसित होत आहे. यामुळे शनिवारपर्यंत उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, देशात 27 जुलैपर्यंत 408.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Jammu-Kashmir: 4 killed, 30 to 40 missing in cloudburst in kishwad area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.