जम्मू-काश्मीरपोलिसांनी आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्रिय असलेले एक मोठे दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मॉड्यूल प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि अंसार गजवत-उल-हिंद (AGuH) शी संबंधित होते.
दरम्यान पोलिसांनी, श्रीनगर, अनंतनाग, गांदरबल आणि शोपियांसह अनेक जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम राबवली. याचबरोबर हरियाणातील फरीदाबाद आणि उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथेही स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापे टाकण्यात आले. या कारवाईत दहशतवादाशी संबंधित दस्तएवज, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, शस्त्रे, दारुगोळा आणि आयईडी बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, या तपासात विद्यार्थ्यांसह विदेशी हँडलरांशी संपर्कात असलेल्या तथाकथित ‘व्हाईट कॉलर’ लोकांचा सहभागही उघड झाला आहे.
या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. यांत... -- अरिफ निसार डार (साहिल), नौगाम, श्रीनगर- यासिर-उल-आशरफ, नौवगाम, श्रीनगर- मकसूद अहमद डार (शाहिद), नौगाम, श्रीनगर- मौलवी इरफान अहमद (मशिदीचा इमाम), शोपियान- जमीर अहमद आहंगर (मुतलाशा), वाकुरा, गंदेरबल- डॉ. मुजम्मिल अहमद गनाई (मुसैब), कोईल, पुलवामा- डॉ. आदिल, वानपोरा, कुलगाम
कारवाईदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटक साहित्य जप्त केले आहे. यांत काडतुसांसह एक चीनी स्टार पिस्तूल, काडतुसांसह एक बेरेट्टा पिस्तूल, काडतुसांसह एक AK-56 रायफल, काडतुसांसह एक AK क्रिंकोव रायफल, तसेच २९०० किलो आयईडी बनविण्याचे साहित्य, जसे की रासायनिक पदार्थ, रिअॅक्टर, बॅटऱ्या, सर्किट, वायर आणि रिमोट कंट्रोलचा समावेश आहे.
दरम्यान, आर्थिक पातळीवरही तपास सुरू आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेटवर्कशी संबंधित निधीच्या स्रोतांचा तपासही केला जात आहे.
आणखी 2563 किलो स्फोटके जप्त - दरम्यान, फरीदाबाद पोलीस आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी सकाळच्या सुमारास फतेहपूर तगा गावातील एका घरावर छापा टाकला, यात २५६३ किलो संशयित स्फोटक जप्त करण्यात आले आहे. याशिवाय, काही दिवसांपूर्वी धौज येथे ३६० किलो स्फोटक सापडले होते.
Web Summary : Jammu Kashmir police busted a major terror module linked to JeM and AGuH, arresting seven, including two doctors and a mosque imam. Raids across multiple districts and states led to the seizure of weapons, explosives, and IED-making materials. Over 2900 kg of explosives were seized.
Web Summary : जम्मू कश्मीर पुलिस ने जैश-ए-मोहम्मद और अंसार गजवत-उल-हिंद से जुड़े एक बड़े आतंकी मॉड्यूल का भंडाफोड़ किया, जिसमें दो डॉक्टरों और एक मस्जिद के इमाम सहित सात लोगों को गिरफ्तार किया गया। हथियारों, विस्फोटकों और आईईडी बनाने की सामग्री जब्त की गई। 2900 किलो से अधिक विस्फोटक बरामद।