शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मोदी, डोवाल यांच्यावर हल्ल्याचा जैशचा कट, दहशतवाद्यांचे विशेष पथक पाठवण्याचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 9:46 AM

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पाकिस्तान आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पाकिस्तान आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या जिव्हारी कलम 370 हटवण्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना मोठा हल्ला करण्याच्या तयारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्यावर हल्ला करण्यासाठी जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना दहशतवाद्यांचे एक विशेष पथक पाठवण्याची तयारी

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पाकिस्तान आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. कलम 370 हटवण्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, कलम 370 हटवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्यावर हल्ला करण्यासाठी जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना दहशतवाद्यांचे एक विशेष पथक पाठवण्याची तयारी जैशने केली आहे. तसेच आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेचा एक मेजर या हल्ल्याच्या तयारीसाठी जैशला मदत करत, असल्याचे गुप्तहेर संघटनांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीममधून समोर आले आहे. एका परदेशी गुप्तहेर संघटनेला जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतावादी संघटनेचा दहशतवादी शमशेर वाणी आणि त्याच्या म्होरक्या यांच्यात झालेल्या संभाषणाची गुप्त माहिती एका  परदेशी दहशतवादी संघटनेला मिळाली. त्यानंतर या गुप्तहेर संघटनेने ही माहिती भारताच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना दिली.  दरम्यान, या गोपनीय माहितीच्या आधारावर जम्मू, अमृतसर, पठाणकोट, जयपूर, गांधीनगर, कानपूर आणि लखनौसह  एकूण 30 अत्यंत संवेदनशील शहरांमध्ये पोलिसांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्याबरोबरच अजित डोवाल यांच्या सुरक्षा व्यवस्थेचीही तपासणी करण्यात आली आहे. अजित डोवाल यांनी पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकमध्ये मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे ते दहशतवादी संघटनांच्या रडारवर आहेत.   दरम्यान, काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय लष्कराने जैश ए मोहम्मदच्या एकेका दहशतवाद्याला शोधून शोधून टिपले आहे. त्यामुळे त्याचा खवळलेला जैशचा  म्होरक्या आपल्या दहशतवाद्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आसुसला आहे. दरम्यान,  5 ऑगस्टनंतर नियंत्रण रेषेवरून आत्मघाती दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र या घुसखोरीचे अनेक प्रयत्न सीमेवर सतर्क असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांनी हाणून पाडले आहेत.  

टॅग्स :Jaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदterroristदहशतवादीNarendra Modiनरेंद्र मोदीAjit Dovalअजित डोवाल