शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

Encounter in Kashmir: काश्मीर खोऱ्यात ३६ तासांत ९ अतिरेक्यांचा केला खात्मा, जैश ए महमदचा टॉप कमांडर श्याम सोफी चकमकीत ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 11:44 AM

Encounter in Kashmir: जैश ए महमद या दहशतवादी संघटनेचा टॉपचा एक प्रमुख कमांडर शमीम उर्फ श्याम सोफी याचा सुरक्षा दलांनी बुधवारी सकाळी चकमकीत खात्मा केला. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुराच्या त्राल भागात तो लपून बसला होता. 

- सुरेश डुग्गरश्रीनगर : जैश ए महमद या दहशतवादी संघटनेचा टॉपचा एक प्रमुख कमांडर शमीम उर्फ श्याम सोफी याचा सुरक्षा दलांनी बुधवारी सकाळी चकमकीत खात्मा केला. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुराच्या त्राल भागात तो लपून बसला होता.  श्याम सोफी हा अनेक अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी होता. तो त्राल भागात येणार असल्याचे कळल्याने सुरक्षा दलाच्या जवानांनी तिथे सापळा रचला होता. त्याचा शोध घेण्यासाठी जवानांनी आसपास राहणाऱ्या कुटुंबांना अन्यत्र हलविले होते. जवान आपल्याजवळ पोहोचले आहेत, हे लक्षात येताच श्याम सोफी याने जवानांवर गोळीबार केला. त्याच्या प्रत्युत्तरात जवानांनी केलेल्या गोळीबारात श्याम सोफी ठार झाला. सोमवारी तीन जणांचा खात्मा करण्यात आला. ते सर्व जण लष्कर ए तय्यबाच्या द रेझिस्टंट फ्रंट या संघटनेशी संबंधित होते. गेल्या ३६ तासांत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या आता ९ झाली आहे. 

अतिरेक्यांची घुसखोरी-गेल्या काही दिवसांत काश्मीर खोऱ्यातील अल्पसंख्याकांवर हल्ले सुरू आहेत. दोन शिक्षक, एक व्यापारी व काही जणांना अतिरेक्यांनी गोळ्या घालून मारले आहे.-जवानांवरही त्यांनी बेधुंद गोळीबार केला. हे सर्व जण पाकिस्तानातून आलेले अतिरेकी आहेत, असे लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.-पाकिस्तानातून २० ते २५ अतिरेकी काश्मीर खोऱ्यात घुसले असल्याचा अंदाज लष्करी अधिकाऱ्यांचा आहे.

घातपाती कारवायांचा कट; नऊ जणांना अटकश्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये घातपाती कारवाया करण्याचा तसेच दिल्लीसह अन्य महत्त्वाच्या शहरांत सायबर हल्ले चढविण्याचा कट आखल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने मंगळवारी श्रीनगर, पुलवामा, शोपियान जिल्ह्यांमध्ये छापे टाकून दहशतवाद्यांच्या नऊ हस्तकांना अटक केली. वसीम अहमद सोफी, तारिक अहमद दार, बिलाल अहमद मीर, तारिक अहमद बाफंदा यांच्यासह नऊ जणांना अटक केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये घातपाती तसेच सायबर हल्ले चढविण्याचा कट लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन, अल बद्र आदी दहशतवादी संघटनांनी आखला आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळताच एनआयएने छापे टाकून नऊ जणांना अटक केली. भडकाविण्याचे प्रयत्नकाश्मीरमधील युवकांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी मार्गाकडे वळविण्याचे कामही दहशतवादी संघटनांचे हस्तक करत असतात. मंगळवारी एनआयएने अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या नऊ हस्तकांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर