शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रीपदावरून गदारोळ, माजी मंत्र्यांच्या घरी जमले गेहलोत गटाचे आमदार, सचिन पायलट अडचणीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 21:20 IST

rajasthan : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपद देणे, अशोक गेहलोत गटातील आमदारांना मान्य नाही.

जयपूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदावरून राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. येथील काँग्रेसमधील अंतर्गत वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. धक्कादायक घडामोडीमध्ये, एकीकडे निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन आमदारांची वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत गटाचे सुमारे 60 आमदार हे माजी मंत्री शांती धारिवली यांच्या घरी जमले आहेत. त्यापैकी दीड डझनहून अधिक मंत्री आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपद देणे, अशोक गेहलोत गटातील आमदारांना मान्य नाही.

निरीक्षकांसमोर हायकमांडने निश्चित केलेल्या नावाला अशोक गेहलोत गटातील आमदार मान्य करणार नाहीत, अशी रणनीती येथे आखली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यापेक्षा संकटाच्या वेळी सरकारच्या पाठीशी उभे राहिलेले 102 आमदार, त्यापैकी कोणाचाही बचाव करतील. पण, त्यांना सचिन पायलट यांचे नाव ऐकायचे नाही. दरम्यान, सचिन पायलट यांनी ज्या वेळी बंड केले होते, त्यावेळी 102 आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला होता.

...तर सरकार पडू शकते - लोढायापूर्वी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सल्लागार आणि अपक्ष आमदार संयम लोढा यांनीही मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, अशोक गेहलोत यांनाच मुख्यमंत्रीपदी ठेवले पाहिजे. कारण, त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपदावरून हटविले तर सरकार पडू शकते. गेहलोत समर्थक आणखी एक मंत्री आणि राष्ट्रीय लोकदलाचे आमदार सुभाष गरव यांनी सचिन पायलट यांच्यावर हल्लाबोल केला. गेहलोत सरकार पाडण्याचा कट रचणाऱ्यांना मुख्यमंत्री केल्यास सरकार पडेल, असे ते म्हणाले.

गेहलोत यांनी घेतले तनोट मातेचे दर्शन दरम्यान, अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत रविवारी दुपारी भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या प्रसिद्ध तनोट मातेच्या दरबारात पोहोचले. 1965 च्या भारत-पाक युद्धात भारतीय जवानांना पाकिस्तानी बॉम्बपासून वाचवण्याच्या ओळखीसाठी प्रसिद्ध असलेल्या या मंदिराबद्दल असे म्हटले जाते की, आईच्या आशीर्वादाने सर्वात मोठे संकट टळू शकते. दरम्यान, काँग्रेसमध्ये राजकीय धुमाकूळ सुरू असताना अशोक गेहलोत यांच्या धार्मिक भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानcongressकाँग्रेस